शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine Crisis : मम्मी, तुम टेन्शन मत लो... बंकरमधून ‘ती’ देतेय दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 07:44 IST

Russia Ukraine Crisis : व्हिडिओ कॉलदरम्यान मुलीशी बोलताना आईला अश्रू अनावर 

मनीषा म्हात्रे  (फोटो : सुशील कदम)Russia Ukraine Crisis : चहूबाजूंनी सैन्याने घेरलेले...युद्धजन्य परिस्थिती... अशातच  ‘मम्मी, तुम टेन्शन मत लो...’ म्हणत युक्रेनच्या विनित्सिया भागात बंकरमध्ये अडकून असलेली मुंबईची यशस्वी सेठिया आईलाच दिलासा देत आहे. मात्र, आईच्या काळजाचा ठोका चुकला आणि मुलगी सुखरूप घरी परतावी यासाठी त्यांची दिवसरात्र धडधड सुरु झाली आहे. यशस्वी युक्रेनमध्ये एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. 

वडाळा परिसरात राहणाऱ्या अर्पिता सेठिया यांची मुलगी यशस्वी ही युक्रेन येथील विनित्सिया विद्यापीठात २०१९ पासून शिक्षणासाठी आहे.  अर्पिता या शिक्षिका असून त्यांचे पती व्यावसायिक आहेत. त्यांचा  एक मुलगा अमेरिकेला असतो. 

युक्रेन - रशिया यांच्यामध्ये युद्धाला सुरुवात झाल्यापासून सेठिया  त्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. आपल्या मुलीला भारतात आणण्यासाठी त्यांची दिवसरात्र धडपड सुरू आहे. मुलीशी सतत व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क सुरू आहे.  सध्या सगळेच विद्यार्थी युद्धाच्या दहशतीखाली आहेत. कधीही, कुठेही बॉम्ब पडू शकतो, अशी भीती त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

सुरुवातीला भारताचे पहिले विमान मुलांना घेण्यासाठी गेले तेव्हा, विद्यापीठाकडून विद्यार्थ्याना आता गेल्यास पुन्हा नव्याने अभ्यासक्रम सुरू करावा लागणार असल्याचे सांगितल्यामुळे विद्यार्थी भीतीने तेथेच थांबले. विद्यापीठ आणि प्रशासनामधील गैरसमज झाल्यामुळे विद्यार्थी तेथेच अडकले. गुरुवारी मिलिटरी कॅम्पवर हल्ला होताच, या विद्यार्थ्याना मिळेल त्या वस्तू, पैसे, खाण्याचे सामान घेऊन  रात्री बंकरमध्ये हलवण्यात आले. जवळपास ८०० विद्यार्थी तेथे असल्याचे अर्पिता सांगतात.  

ट्रेन विद्यार्थ्याना घेऊन पुन्हा माघारी

  • शुक्रवारी त्यांची मुलगी यशस्वीने बंकरमधून आईला व्हिडिओ कॉल केला. 
  • मुलीला पाहून अर्पिता यांना अश्रू अनावर झाले. यातच, स्वतः भीतीच्या सावटाखाली असतानाही यशस्वी आईलाच ‘टेन्शन मत लो’ म्हणत काळजी घेण्यास सांगत आहे.
  • आम्ही सुरक्षित आहोत. येथील काही विद्यार्थ्याना सायंकाळी ट्रेनने रुमानियाला घेऊन जात असल्याचे सांगितले. मात्र अर्ध्या वाटेवरून पुन्हा माघारी आणले. 
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndiaभारतMumbaiमुंबई