शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

Russia Ukraine Crisis: रशियाची अमेरिकेवर कारवाई, कमला हॅरिस आणि मार्क झुकरबर्गसह 90 लोकांवर 'ट्रॅव्हल बॅन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 11:09 IST

Russia Ukraine Crisis: रशियाने अमेरिका आणि कॅनडातील लोकांवर प्रवास बंदी घातली आहे. यात अनेक संरक्षण अधिकारी, उद्योजक, राजकीय नेते आणि पत्रकारांचा समावेश आहे.

Russia Ukraine Crisis: युक्रेन-रशिया युद्धादरम्यान रशियाने अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि फेसबुकचे मार्क झुकरबर्ग यांच्यासह अनेकच्या प्रवासावर बंदी घातली आहे. अमेरिका रशियावर सातत्याने निर्बंध लादून आर्थिकदृष्ट्या कमकुवत करत असताना रशियाने हे पाऊल उचलले आहे. अमेरिका युक्रेनला सतत मदत करत असून रशियाविरुद्ध लढण्यासाठी शस्त्रे देत असल्याने रशियानेही या लोकांवर बंदी घातली आहे. रशियाने ज्या लोकांवर बंदी घातली आहे त्यात अमेरिकन आणि कॅनडियन वंशाच्या जवळपास 90 लोकांची नावे आहेत. दोन्ही देशांचे संरक्षण अधिकारी, व्यावसायिक नेते आणि पत्रकारांचाही या यादीत समावेश आहे. रशियाने गुरुवारी बंदी जाहीर केलीगुरुवारी रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, रशियाने 29 अमेरिकन आणि 61 कॅनेडियन नागरिकांच्या प्रवासावर बंदी घातली आहे. ही बंदी अनिश्चित काळासाठी लागू राहणार असल्याचेही मंत्रालयामार्फत सांगण्यात आले आहे. निर्बंधांमध्ये अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यासह एबीसी न्यूज टेलिव्हिजन प्रेझेंटर जॉर्ज स्टेफनोपॉलोस, वॉशिंग्टन पोस्टचे स्तंभलेखक डेव्हिड इग्नेशियस आणि रशिया-केंद्रित मेडुझा न्यूज साइटचे संपादक केविन रोथ्रॉक यांचा समावेश आहे. एवढेच नाही तर पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी आणि उप संरक्षण सचिव कॅथलीन हिक्स यांचेही या यादीत नाव आहे.

अमेरिकेची युक्रेनला मदतरशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून आतापर्यंत अमेरिकेने अनेकदा युक्रेनला आर्थिक मदत आणि शस्त्रे पुरवली आहेत. रशियाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठीच अमेरिका युक्रेनला मदत करत आहे. दुसरीकडे, रशियाने कॅनडाच्या कॅमेरून अहमद, पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि कॅनेडियन स्पेशल ऑपरेशन्स फोर्स कमांडर स्टीव्ह बोईविन यांच्यावरही बंदी घातली आहे. कॅनडाही युक्रेनला मदत करत असल्याचा रशियाचा आरोप आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाAmericaअमेरिकाCanadaकॅनडा