शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine Crisis : "मी भारतात पाय ठेवला अन् चर्नीव्हिन्सीमध्ये झाला हल्ला" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 06:19 IST

Russia Ukraine Crisis : युक्रेनमधून मायदेशी सुखरूप परतलेल्या मोक्षदाचा अनुभव

हणमंत गायकवाड 

लातूर : मी चर्नीव्हिन्सीतून २१ फेब्रुवारीला निवासस्थान सोडले अन् किव्ह येथून विमानात बसून मुंबईत २३ फेब्रुवारीला परतले आणि तिकडे हल्ला झाला. एरव्ही एक दिवस दोन तासामध्ये भारतात पोहोचत असे; पण या युद्धजन्य परिस्थितीमुळे दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागला. विमानातून मुंबईत उतरल्यानंतर जीव भांड्यात पडला. समोर वडिलांना पाहून चर्नीव्हिन्सी विसरून गेले, अशी भावना युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या मोक्षदा कदमने व्यक्त केली.  

चर्नीव्हिन्सीमध्ये गॅस, पाणी आणि करन्सीची समस्या निर्माण होईल. युद्धाचा भडका कधीही होईल, असे गेल्या आठवड्यापासून सांगितले जात होते. त्यामुळे डॉलर चेंज करून सोबत ठेवा, गॅस, पाण्याचाही साठा ठेवण्याच्या सूचना आमच्या शिक्षकांकडूनही केल्या जात होत्या. त्याचवेळी मी गावाकडे येण्याचा निर्णय घेतला. 

वडिलांनीही तत्काळ परत निघण्याचा सल्ला दिला, पण विमानाचे तिकीट मिळत नव्हते. दोन-तीन दिवसांच्या वेटिंगनंतर तिकीट मिळाले आणि बुधवारी रात्री भारतात पोहोचले. गुरुवारी सकाळी लातूरमध्ये पोहोचले, तर तिथे हल्ला झाल्याची बातमी ऐकायला मिळाली. माझ्या निवासस्थान परिसराच्या पाच-दहा किलोमीटर अंतरात हे हल्ले झाले आहेत. त्यामुळे मायदेशात सुखरूप परतल्याचा आनंद असल्याचे मोक्षदा म्हणाली. परिस्थिती निवळल्यानंतर पुन्हा जाणारपश्चिम युक्रेनमध्ये धोका नाही, असे सांगितले जात होते; पण तेथेही हल्ला झाला. पूर्व युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थिती मी येण्यापूर्वीच होती, असे बातम्यांत पाहिले होते. असो, आता मी भारतात पोहोचले आहे. सगळे निवळल्यानंतरच पुढील शिक्षणासाठी युक्रेनला जाण्याचा विचार करीन, असेही मोक्षदाने सांगितले.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाMaharashtraमहाराष्ट्रlaturलातूर