शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
2
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
3
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
4
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
5
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
6
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
7
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
8
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
9
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
10
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
11
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
12
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
13
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
14
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
15
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
16
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
17
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
18
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
19
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
20
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?

Russia Ukraine Crisis : ...पण भारतीयांचे स्पिरीट जागे होते; धास्तावलेल्या विद्यार्थ्यांना परतण्याचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 06:12 IST

Russia Ukraine Crisis :मनात धास्तीने घर केले तरी ते डगमगले नाहीत. युक्रेनमधील हे भारतीय विद्यार्थी हिंमतीनं उभे राहिले....‘लोकमत’ने संपर्क साधून त्यांना धीर दिला.

युद्धाला तोंड फुटले. तोफा धडाडल्या. रॉकेट येऊन हाताभराच्या अंतरावर कोसळले. आसमंत सायरनच्या आवाजाने व्यापला आणि बंकरमध्ये धावणारे तरूण जीव काळजीत पडले, घाबरलेही. पण भारतीय स्पिरीट जागे होते. मनात धास्तीने घर केले तरी ते डगमगले नाहीत. युक्रेनमधील हे भारतीय विद्यार्थी हिंमतीनं उभे राहिले....‘लोकमत’ने संपर्क साधून त्यांना धीर दिला.

लोकमतच्या राज्यभरातील प्रतिनिधींनी युद्धजन्य भाग, बंकरमधील मुलांशी थेट संपर्क साधला. त्यांची ख्याली-खुशाली जाणून घेतली. त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. हे सर्व विद्यार्थी सुखरूप असून लवकरच आपापल्या घरी परतण्यास सुरुवात होईल. 

विद्यार्थ्यांनी आपबिती सांगितली. पण, विपरित स्थितीलाही ते कसे समर्थपणे तोंड देत आहेत, हे सांगितले. घरी परतण्याची ओढ जाणवली, सुखरूप परतण्याचा विश्वासही त्यांच्या बोलण्यातून जाणवला. आपल्या आई-वडिलांशी बोलतानाही ही मुले त्यांना धीर देताना दिसली.     

व्हिडिओ काॅलद्वारे संवादयुक्रेनमधील ओडेसा शहरात अडकलेल्या संकेत राघवेंद्र पाठक या गंगाखेड (जि. परभणी) येथील विद्यार्थ्याशी ‘लोकमत’चे जिल्हा प्रतिनिधी अभिमन्यू कांबळे यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधून विचारपूस केली आणि धीरही दिला.

राज्यातील १२०० विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून ३०० विद्यार्थ्यांशी आमचा संपर्क झालेला आहे. राज्य नियंत्रण कक्ष त्यांच्या संपर्कात असून त्यांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विजय वडेट्टीवार, मदत व पुनर्वसन मंत्रीप्रत्येकाच्या हातात बंदुका, जिकडे पहावे तिकडे गोळीबार, बॉम्बवर्षावामुळे कानठळ्या बसविणारे आवाज असे चित्र दोन दिवसांपासून अनुभवत आहे. थंडीत मेट्रो स्टेशनमध्ये दोन रात्री काढल्या, आता भारतीय दूतावासात पोहचलो. भारताने तातडीने आमची सुटका करावी. यशवंत संतोष चौधरी, नंदूरबार

मी सध्या ओडेसा शहरात राहत आहे. गुरुवारी शहरापासून दहा किमी अंतरावर आर्मी बंकरवर रशियन फौजांनी बॉम्बहल्ला केला. त्यामुळे मनात धस्स झाले होते. भीती वाटत होती; परंतु धीर धरला. आता १० ते १२ दिवसांचे अन्न साठवून ठेवलेले आहे. त्यामुळे जेवणाची चिंता नाही. संकेत राघवेंद्र पाठक, गंगाखेड (जि. परभणी)  

आम्ही शेल्टरचा आसरा घेतलाय. सतत बॉम्ब वर्षाव होत असला तरी आपण सुरक्षित आहोत. कोणी मेट्रोच्या स्टेशनचा आसरा घेतलाय तर कुणी कॉलेजच्या हॉस्टेलवर स्वतःला अक्षरश कोंडून घेतले आहे. जीव मुठीत धरून आहोत, पण मनात सुरक्षितपणे मायदेश गाठू, असा विश्वास आहे. शिवानी लोणकर, पुणे 

मी चर्नी युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमध्ये राहताे. पाच दिवसांपूर्वीच युक्रेनमध्ये पोहोचलाे. दुसऱ्याच दिवशी युद्धाला तोंड फुटले. मात्र, बॉम्बहल्ला झाला ते ठिकाण आपल्या हॉस्टेलपासून ५५० किलोमीटर अंतरावर असल्याने सध्या तरी आम्ही सुरक्षित आहाेत.संकेत राजेश चव्हाण, दारव्हा (जि. यवतमाळ) 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndiaभारतLokmatलोकमत