शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine Crisis : एजंटांमुळे युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांपुढे मोठ्या समस्या, प्रवासासाठी अव्वाच्या सव्वा पैशांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 07:15 IST

Russia Ukraine Crisis : भारतीय विद्यार्थी देतात एकमेकांना धीर.

पोपट पवार

Russia Ukraine Crisis :  रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यांना युक्रेनमध्ये वैद्यकीय प्रवेश मिळवून देणारे एजंटच भारतीय विद्यार्थ्यांच्या मुळावर उठले आहेत. भारतात परतण्यासाठी या एजंटांनी अव्वाच्या-सव्वा पैशांची मागणी करत या विद्यार्थ्यांना खिंडीत गाठले आहे. याबाबत ‘लोकमत’ने युक्रेनच्या उझगोरोड शहरात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या शार्दूल भागवत बाबर (मूळ गाव. चोपडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) याच्याबरोबर थेट संवाद साधला. यावेळी त्याने आपली आपबिती कथन केली.

शार्दूलने २०१७ मध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी उझगोरोड विद्यापीठात प्रवेश घेतला. सध्या तो एमबीबीएसच्या पाचव्या वर्षात आहे. भारतातील तब्बल ८०० विद्यार्थी या शहरात सध्या वैद्यकीय शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत. भारतीय दुतावासांशी संपर्क होत नसल्याने ते सैरभैर झाले आहेत. अशातच पंजाब, उत्तर प्रदेश या भागातील युक्रेनस्थित एजंट या विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना मायदेशी सोडण्याचे आमिष दाखवत आहेत. प्रचलित विमान तिकीटापेक्षा तीन-चार पट अधिक दर एजंट सांगत आहेत. भारत सरकार आम्हाला मायदेशी नेण्यासाठी कोणती भूमिका घेत आहे, यावर आमची नजर असली तरी युद्धाच्या गडद छायेमुळे आमचाही धीर खचत आहे. परिणामी, अनेकजण एजंटच्या आमिषाला बळी पडल्याचे शार्दूल म्हणाला. उझगोरोड सर्वांत सुरक्षित; पण...हंगेरी अन् स्लोव्हाकियाच्या बॉर्डरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उझगो रोड शहरात युद्धाच्या झळा बसत नसल्या तरी युक्रेनवर उद्भवलेल्या संकटामुळे हे शहरही भीतीच्या सावटाखाली आहे. अनेक जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद होत असल्याने नागरिक वस्तूंचा साठा करत असल्याचे शार्दूलने सांगितले. 

आतापर्यंत माझा मुलगा देशात सुरक्षित होता; पण युद्धजन्य परिस्थितीमुळे भीती वाटू लागली आहे. सरकारने तिथे अडकलेल्या मुलांना त्वरित मायदेशी आणावे.- डॉ. चंद्रकला बाबर, शार्दूलची आई

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाStudentविद्यार्थी