शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

Russia-Ukraine Conflict: युक्रेनची अणुभट्टी थोडक्यात बचावली; युरोपमधील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर रशियाचा ताबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 06:08 IST

Russia-Ukraine Conflict: रशियन सैन्याने जपाेजिरिया अणू ऊर्जा प्रकल्पाचा ताबा घेतला आहे. हा युराेपमधील सर्वांत माेठा अणू ऊर्जा प्रकल्प आहे.

माॅस्काे/कीव्ह : रशियन सैन्याने जपाेजिरिया अणू ऊर्जा प्रकल्पाचा ताबा घेतला आहे. हा युराेपमधील सर्वांत माेठा अणू ऊर्जा प्रकल्प आहे. रशियाने प्रकल्पावर क्षेपणास्त्राने हल्ला केला; मात्र सुदैवाने ते अणुभट्टीवर पडले नाही. त्यामुळे भीषण अणूअपघात टळला. या घटनेमुळे युराेपची चिंता वाढली आहे.  युक्रेनवर हल्ल्याच्या नवव्या दिवशी रशियाने चर्निहिव्हवर जाेरदार बाॅम्बहल्ला केला असून, गेल्या २४ तासांमध्ये तेथे ४७ जणांचा मृत्यू झाला आहे, मात्र जपाेजिरिया प्रकल्पावर रशियाने क्षेपणास्त्राने हल्ला चढविल्यामुळे युराेपला धडकी भरली हाेती. रशियाच्या हल्ल्यात प्रकल्पाच्या सुरक्षेतील ३ सैनिकांचा मृत्यू झाला. रशियन क्षेपणास्त्र प्रशिक्षण केंद्रावर पडले. 

ते अणुभट्टीवर काेसळले असते, तर चेर्नाेबिलपेक्षा १० पट माेठ्या घटनेचा धाेका हाेता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जाे बायडेन यांनी रशियन अधिकाऱ्यांसाेबत चर्चा केल्यानंतर आपत्कालीन पथकाला जपाेरिजिया प्रकल्पात जाण्याची परवानगी देण्यात आली. सद्य:स्थितीत किरणोत्सर्गाची पातळी वाढल्याचे संकेत नाहीत. प्रकल्पातील आग विझविण्यात आली आहे, असे तपासणी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितले.

चेर्नाेबिलपेक्षा १० पट माेठा प्रकल्प

हा प्रकल्प निपर नदीजवळ असून, चेर्नाेबिलपेक्षा १० पट माेठा आहे. रशियन सैन्याने सकाळपासून त्यावर हल्ला चढविला हाेता. याठिकाणी ६ अणुभट्ट्या आहेत. त्यापैकी १ अणुभट्टी सध्या ६० टक्के क्षमतेवर सुरू आहे. हे शहर रशियाच्या ताब्यात गेल्यास युक्रेनची माेठी आर्थिक काेंडी हाेण्याची शक्यता आहे.

रशियन लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू

रशियन सैन्याने कीव्हला वेढा दिला आहे. मात्र, कीव्ह ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात रशियाचे एक प्रमुख लष्करी अधिकारी मेजर जनरल आंद्रेई सुखाेवत्स्की यांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. रशियाने अधिकृतरीत्या अद्याप याबाबत माहिती जाहीर केलेली नाही; परंतु सुखाेवत्स्की यांची युक्रेनी स्नायपरने हत्या केल्याचे सूत्रांनी सांगितले.

जेलेन्स्की पोलंडमध्ये पळून गेले : रशिया

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की हे पोलंडमध्ये पळून गेल्याचा दावा रशियाने केला आहे. मात्र, युक्रेनने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केेलेली नाही. युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियाचा मुकाबला करण्याचा निर्धार जेलेन्स्की यांनी व्यक्त केला होता. रशियाच्या दाव्यावर युक्रेनमधील असंख्य लोक विश्वास ठेवायला तयार नाहीत.

कीव्हमध्ये गोळीबारात एक भारतीय विद्यार्थी जखमी

कीव्ह येथून कारने दुसऱ्या ठिकाणी जाण्याच्या प्रयत्नात असलेला हरजोतसिंग हा भारतीय विद्यार्थी गोळीबारात जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या छातीत, खांद्यात व गुडघ्यात गोळी लागली आहे. ही घटना चार दिवसांपूर्वी घडली. हरजोतवर झालेला गोळीबार रशिया की युक्रेनच्या सैनिकांनी केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हरजोतसिंग मूळ दिल्लीचा रहिवासी असून, त्याच्या जिवाला असलेला धोका आता टळला आहे.

युनोच्या मतदानाला भारत अनुपस्थित

- युक्रेनवर रशियाने केलेल्या आक्रमणाची चौकशी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय आयोग स्थापन करण्याच्या ठरावावर संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क समितीच्या बैठकीत शुक्रवारी झालेल्या मतदानाला भारत अनुपस्थित राहिला. 

- या ठरावाच्या बाजूने ३२ देशांनी मतदान केले. ठरावाच्या विरोधात रशिया व एरिट्रिया या दोन देशांनी मतदान केले, तर भारत, चीन, पाकिस्तान, सुदान, व्हेनेझुएला यांच्यासह तेरा देश मतदानाला अनुपस्थित राहिले.

युक्रेनमध्ये एकूण १५ अणुऊर्जा प्रकल्प आहेत. काेणत्याही केंद्रात स्फाेट झाला, तर ताे आपल्या सर्वांचा, युराेपचा अंत असेल. संपूर्ण युराेप रिकामा करावा लागेल. युराेपने याबाबत पावले उचलली तरच रशियन फाैजा थांबतील. रशियाच्या अध्यक्षांशी माझ्यासोबत चर्चेला बसावे. यातून नक्की तोडगा काढला जाईल.  - वाेलाेदिमीर जेलेन्स्की, राष्ट्राध्यक्ष, युक्रेन

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया