शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War: रशिया युक्रेनवर हल्ला करणार, 'या' देशाला आधीच माहीत होतं! समोर आली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 09:31 IST

रशिया युक्रेनवर हल्ला करणार यासंदर्भातही चीनला माहिती होती, असे संकेत गुप्तचर खात्याच्या अहवालातून मिळतात, असे न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले आहे.

वॉशिंग्टन -  रशिया आणि युक्रेन यांच्यात भयंकर युद्ध सुरू आहे. पण, रशिया युक्रेनवर हल्ला करणार, हे चीनला आधीपासूनच माहीत होते का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण, बिजिंग विटर ऑलिम्पिक होईपर्यंत युक्रेनवर हल्ला करणे टाळावे, असे चीनने रशिला सांगितले होते, असा खळबळजनक दावा माध्यमातील वृत्तांनी केला आहे.

चीनने रशियासोबत केली होती चर्चा - द गार्डियनमधील प्रसिद्ध वृत्तानुसार, रशिया-युक्रेन युद्ध सुरू होण्या पूर्वी फेब्रुवारीच्या सुरुवातीला चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी  रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. बिजिंगमधील हिवाळी ऑलिम्पिक संपण्यापूर्वी युक्रेनवर हल्ला करू नये, असे चिनी अधिकाऱ्यांनी म्हटले होते. यासंदर्भात माहिती देताना न्यू यॉर्क टाईम्सने, बायडेन प्रशासनातील अधिकारी आणि एका युरोपियन अधिकाऱ्याचा हवाला दिला आहे.

माहीत होती संपूर्ण योजना -चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना रशियाच्या योजनेसंदर्भात आधीपासूनच माहिती होती. याच बरोबर रशिया युक्रेनवर हल्ला करणार यासंदर्भातही चीनला माहिती होती, असे संकेत गुप्तचर खात्याच्या अहवालातून मिळतात, असेही न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले आहे.

अहवाल निराधार - चीनयासंदर्भात बोलताना, वॉशिंग्टनमधील चिनी दूतावासाचे प्रवक्ते लिउ पेंग्यू म्हणाले, संबंधित रिपोर्टला कसल्याही प्रकारचा आधार नाही. याचा उद्देश केवळ चीनला दोष देणे आणि त्याच्यावर डाग लावणे एवढाच आहे. यावर अमेरिकन परराष्ट्र विभागाने, CIA आणि व्हाईट हाऊसच्या राष्ट्रिय सुरक्षा परिषदेने अद्याप कसल्याही प्रकारचे भाष्य केलेले नाही.

न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, चीन आणि रशियन अधिकाऱ्यांत झालेल्या चर्चेची गुप्त माहिती एका पाश्चिमात्य गुप्तचर सर्व्हिसने एकत्रित केली होती आणि याची समीक्षा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी ती विश्वसनीय असल्याचे म्हटले होते.

चर्चेचे ठोस पुरावे नाहीत -टाईम्सच्या वृत्तानुसार, एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, गुप्त माहिती माहीत होती. पण यावरू, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि पुतिन यांच्या पातळीवर काही चर्चा झाल्याचे स्पष्ट होत नाही.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाchinaचीनrussiaरशियाwarयुद्धAmericaअमेरिका