शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukrain War: "व्लादिमीर पुतिन यांना लवकरच सत्ता सोडावी लागेल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 06:06 IST

Russia-Ukrain War: अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन; रशिया संतापला

वॉशिंग्टन : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना लवकरच सत्ता सोडावी लागेल. त्यांच्यासारखा माणूस सत्तास्थानी असणे योग्य नाही, असे उद्गार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पोलंडच्या दौऱ्यात काढले. त्यावर पुतीन यांनी काय करायचे हे ठरविणारे तुम्ही कोण, असा संतप्त सवाल रशियाने अमेरिकेला विचारला आहे. त्यावर रशियात सत्ताबदल करण्याची अमेरिकेची कोणतीही योजना नाही, अशी सारवासारव बायडेन सरकारने केली आहे. जो बायडेन यांनी म्हटले होते की, पुतिन यांनी युक्रेनमध्ये नरसंहार चालविला आहे. ते युद्ध गुन्हेगार आहेत. कोणत्याही कारणाविना रशियाने युक्रेनवर आक्रमण केले असून, त्यामध्ये हजारो नागरिक मारले जात आहेत. युक्रेनचे यु्द्ध रशियाने तातडीने थांबवावे. रशियाचे सामान्य नागरिक हे काही अमेरिकेचे शत्रू नाहीत, असेही ते म्हणाले होते. पुतीन यांच्याबाबतच्या बायडेन यांच्या वक्तव्यांवर रशियाने म्हटले आहे की, पुतिन यांनी सत्तापदी राहावे की न राहावे, हा सर्वस्वी रशियाचा प्रश्न आहे. पुतिन यांना सल्ला देण्याचा बायडेन यांना काय अधिकार आहे, असाही जाब रशियाने विचारला आहे. 

रशियन सैनिकांकडून लष्करी अधिकाऱ्याची हत्या?रशियाचे लेफ्टनंट जनरल याकोव रेझानत्सेव यांना त्या देशाच्या सैनिकांनीच ठार मारले असल्याचा दावा पाश्चिमात्य देशांनी केला आहे. युक्रेनवर आक्रमण करूनही अपेक्षित विजय मिळत नसल्याने, निराश झालेल्या रशियन सैनिकांनी हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. या युद्धात रशियाच्या लष्कराचे सात वरिष्ठ अधिकारी ठार झाल्याचा युक्रेन लष्कराने केला आहे. युक्रेनवर रशिया काही तासांत विजय मिळवेल, असा दावा युद्ध सुरू झाल्यानंतर याकोव रेझानत्सेव यांनी केला होता. 

युक्रेनविरोधात सुरू केलेले युद्ध हा रशियाचा धोरणात्मक पराभव आहे, अशी टीका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केली. ते म्हणाले की, रशियाने युक्रेनविरोधात सुरू केलेले युद्ध लगेचच संपेल, अशी चिन्हे नाहीत.  

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाJoe Bidenज्यो बायडनVladimir Putinव्लादिमीर पुतिन