शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

‘पुतीन लवकरच मरणार आणि…’, युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी केलं भाकित, कारणही सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 13:14 IST

Russia Ukrain War: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेलं युद्ध अनेक प्रयत्नांनंतरही थांबण्याची चिन्हे दिसत नाही आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी धक्कादायक भाकित केलं आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेलं युद्ध अनेक प्रयत्नांनंतरही थांबण्याची चिन्हे दिसत नाही आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी धक्कादायक भाकित केलं आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचा लवकरत मृत्यू होईल आणि त्याबरोबरच दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचीही अखेर होईल, असा दावा झेलेन्स्की यांनी केला आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या आरोग्याबाबत करण्यात येत असलेल्या दाव्यांदरम्यान झेलेन्स्की यांनी हे भाकित केले आहे.

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूअल मॅक्रॉ यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर झेलेन्स्की यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की,  व्लादिमीर पुतीन यांचा लवकरच मृत्यू होईल, हे एक वास्तव आहे, त्यानंतर या युद्धाची अखेर होईल, असा दावा झेलेन्स्की यांनी केला.

मागच्या अनेक महिन्यांपासून रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पुतीन यांचे सतत खोकत असल्याचे आणि हाता पायाला झटके येत असल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले होते. या व्हिडीओंनंतर या अफवांना बळ मिळाले होते.

दरम्यान, व्लादिमीर पुतीन यांना पार्किंसनचा आजार असून, त्यांना कर्करोगही झाला असल्याचे दावे अनेक वृत्तांमधन करण्यात आले होते.  मात्र या वृत्तांना दुजोरा मिळाला नव्हता. तसेच रशियन प्रशासनानेही हे दावे फेटाळून लावले होते.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियासोबत असलेल्या युद्धाबाबतही मोठं भाकित केलं आहे. शांततेसाठी प्रयत्न सुरू असतानाही रशियाकडून युद्ध लांबवलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, युद्ध सुरू राहावं, असं रशियाला वाटतं. त्यामुळे ते हे युद्ध लांबवत आहेत. युद्ध संपुष्टात आणण्यासाठी रशियावर दबाव आणण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन