शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 05:34 IST

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या पाचव्या कार्यकाळाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी तसेच दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीचा पराभव म्हणून साजऱ्या केल्या जाणाऱ्या विजय दिवसापूर्वी ही घोषणा करण्यात आली आहे.

मॉक्सो : पश्चिमी देशांनी युक्रेनसोबतच्या युद्धाबाबत रशियाविरुद्ध वक्तव्य केल्यानंतर रशिया अधिक आक्रमक झाला असून, त्यांनी अण्वस्त्रांसह लष्करी सरावाची योजना आखली आहे. त्यामुळे जगभरात तणाव आणखी वाढला आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या पाचव्या कार्यकाळाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी तसेच दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीचा पराभव म्हणून साजऱ्या केल्या जाणाऱ्या विजय दिवसापूर्वी ही घोषणा करण्यात आली आहे. अण्वस्त्रांसह लष्करी सराव हा रशियाबाबत काही पाश्चात्य देशांच्या अधिकाऱ्यांकडून प्रक्षोभक विधाने आणि धमक्यांना दिलेले उत्तर आहे, असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने निवेदन जारी करत म्हटले आहे.

फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे म्हटले. तर ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डेव्हिड कॅमेरॉन यांनी सांगितले की किव्हचे सैन्य रशियाच्या आत लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी ब्रिटनची शस्त्रे वापरू शकतात. त्यानंतर रशियाने ही नवीन चाल खेळली आहे.

तब्बल १ लाख लोकांना हाकलणार, युद्ध वाढणाररफाह : इस्रायली सैन्याने पॅलेस्टिनींना दक्षिण गाझा शहर रफाह रिकामे करण्यास सांगितले आहे. यामुळे तेथे लवकरच जमिनीवरून हल्ला होण्याचे संकेत मिळत आहेत. इस्रायली सैन्याच्या घोषणेने युद्धविरामासाठी मध्यस्थीचे प्रयत्न अवघड झाले आहेत. इस्रायलने सात महिन्यांच्या युद्धानंतर रफाहला हमासचा शेवटचा महत्त्वाचा गड असे म्हटले आहे. लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल नदाव शोशानी यांनी म्हटले की, १ लाख लोकांना रफाहमधून बाहेर पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशिया