शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Russia vs Ukraine War: युक्रेनवर रशियाने केला ‘हायपरसॉनिक’ हल्ला; भूमिगत शस्त्रागार उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 07:36 IST

हल्ल्यामुळे युक्रेनी लष्कराचे मोठे नुकसान

कीव्ह : युद्धाला तोंड फुटून २४ दिवस लोटले तरी युक्रेन शरण येत नसल्याने बिथरलेल्या रशियाने अखेरीस आपल्या भात्यातील प्रभावी अस्त्रे काढली आहेत. शनिवारी रशियाने किन्झॉल या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचा वापर केला. युक्रेनच्या पश्चिमेला असलेल्या इव्हानो-फ्रँकिव्ह्स्क या प्रांतातील डेलियाटिन या गावावर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात युक्रेनी लष्कराने लपवून ठेवलेले भूमिगत शस्त्रागार उद्ध्वस्त झाले.रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला शनिवारी २४ दिवस पूर्ण झाले. या युद्धात प्रथमच रशियाने हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचा हल्ला केला. दरम्यान, कीव्हजवळील माकारिव्ह येथे रशियाने केलेल्या अन्य एका हल्ल्यात सात जण ठार झाले. युक्रेनच्या ओडेसा प्रांतानजीक केलेल्या हल्ल्यात सर्व रेडिओ टेहळणी केंद्रे उद्ध्वस्त झाल्याचा दावा रशियन सैन्याने केला आहे. ‘त्या’ विद्यार्थ्याचे पार्थिव आज भारतात रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये मरण पावलेला भारतीय विद्यार्थी नवीन शेखरप्पा ग्यानगौदर याचा मृतदेह सोमवारी, २१ मार्च रोजी बंगळुरू येथे आणला जाण्याची शक्यता आहे. नवीनचे देहदान कर्नाटकमधील एका खासगी रुग्णालयाला करण्याचा निर्णय त्याच्या पालकांनी घेतला आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया