शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

Russia : “...हल्ले हा रशियाचाच डाव,” पुतिन यांच्या हत्येच्या प्रयत्नांच्या आरोपाचं युक्रेनकडून खंडन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 22:13 IST

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले 'महायुद्ध' थांबण्याचं नाव घेत नाहीये.

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले 'महायुद्ध' थांबण्याचं नाव घेत नाहीये. दरम्यान, रशियानं युक्रेनवर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला होता. युक्रेननं पुतिन यांना मारण्यासाठी क्रेमलिनवर ड्रोननं हल्ला केला. मात्र या हल्ल्यात पुतिन यांना कोणतीही इजा झालेली नाही. ते पूर्णपणे सुरक्षित असल्याचं रशियानं म्हटलं होतं. दरम्यान, या प्रकरणावर आता युक्रेनकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलं असून या ड्रोन हल्ल्याशी आमचं कोणतंही घेणंदेणं नाही असं त्यांनी म्हटलंय. 

“क्रेमलिनवर कोणी कथितरित्या हल्ला केला या घटनेची आम्हाला माहिती नाही. आम्ही आमच्या देशाचं संरक्षण करत आहोत. दुसऱ्यांवर हल्ल्याचा आमचा कोणताही हेतू नाही. आमचं याच्याशी कोणतंही देणं-घेणं नाही. रशिया केवळ युक्रेनला नष्ट करण्याचं निमित्त शोधत आहे,” अशी प्रतिक्रिया युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलादिमीर झेलेन्स्की यांचे प्रवक्ते मिखाइलो पोडोलियाक यांनी दिली.

युक्रेनने कथित हल्ल्यांना रशियाचाच डाव असल्याचं म्हटलं आहे. "रशियाच्या अशा बनावट रिपोर्टला युक्रेनवर मोठ्या प्रमाणावर दहशतवादी हल्ल्याची पार्श्वभूमी तयार करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले पाहिजे,” असंही युक्रेननं म्हटलंय.

हल्ल्यानंतर पुतिन बंकरमधून काम करतील

क्रेमलिन मीडियानुसार, या हल्ल्यानंतर पुतिन नोवो-ओगारेवो येथील त्यांच्या निवासस्थानी बांधलेल्या बंकरमधून काम करतील. रशिया युक्रेनच्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी करत असल्याचं म्हटलं जात आहे. या ड्रोन हल्ल्यानंतरही रशियात ९ मे रोजी होणारी परेड पुढे ढकलली जाणार नाही. त्याच वेळी, मॉस्कोच्या महापौरांनी ड्रोनच्या उड्डाणावर बंदी घातली आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन