शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 15:42 IST

रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील ट्रेन सेवा पुन्हा सुरू होत आहे. उत्तर कोरियाने युक्रेन युद्धात रशियाच्या बाजूने लढण्यासाठी त्यांचे जवळपास १० हजार सैनिक पाठवले होते. 

जगापासून दूर, अज्ञातवासात राहणे पसंत करणाऱ्या उत्तर कोरियातील सौंदर्य, आर्किटेक्टर आणि तिथले समुद्र किनारे आता पर्यटकांसाठी खुले होणार आहे. उत्तर कोरिया हा परिसर जागतिक पर्यटकांसाठीही खुला करण्याची शक्यता आहे. २४ जूनला उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उनने देशातील उत्तरेकडील वोनसान कलमा(Wonsan Kalma) या सागरी किनाऱ्याला सार्वजनिक केले आहे. 

या सागरी किनाऱ्याचे अलौकिक सौंदर्य, निसर्गाने नटलेला परिसर जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. परंतु उत्तर कोरिया आणि किम जोंग ऊन यांच्याविषयीही चर्चा सुरू आहे. किम जोंग ऊन यांची मुलगी किम जू ए(Kim Ju Ae) हिच्या हातात उत्तर कोरियाचा कारभार सोपवण्याची शक्यता आहे. २४ जूनला किम जोंग ऊन वोनसान कलमा बीचवर नजरेस आले तिथे त्यांच्यासोबत किम जून ए हीदेखील उपस्थित होती. तिला अशाप्रकारे प्रोटोकॉल दिला होता जशी ती आगामी काळात उत्तर कोरियाची उत्तराधिकारी आहे. विशेष म्हणजे किम जोंग उन पत्नी रि सोल जू यापण कार्यक्रमात उपस्थित होत्या परंतु त्या पतीजवळ फार कमी दिसून आल्या. 

जागतिक मीडियानुसार, वोनसान कलमा बीचचं बांधकाम कित्येक वर्षापासून सुरू होते. परंतु कोरोना काळात हे काम थांबले. त्यानंतर २०२४ साली रशियाने या कामात उत्तर कोरियाची मदत केली. त्यानंतर या बांधकामाने वेग पकडला. या पर्यटन स्थळाचे उद्घाटन सोहळ्यात उत्तर कोरियातील रशियाचे राजदूत आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना विशेष पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते. येत्या १ जुलैपासून हे पर्यटन केंद्र लोकांसाठी खुले केले जाईल. त्यात परदेशी पर्यटकांमध्ये रशियन नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे. रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील ट्रेन सेवा पुन्हा सुरू होत आहे. उत्तर कोरियाने युक्रेन युद्धात रशियाच्या बाजूने लढण्यासाठी त्यांचे जवळपास १० हजार सैनिक पाठवले होते. 

दरम्यान, किम जू ए सध्या उत्तर कोरियात लोकप्रिय होत आहे परंतु पुरुष प्रधान समाज असणाऱ्या उत्तर कोरियात सत्ता कायम पुरुषांकडेच राहिली आहे. किम जोंग उन यांच्याआधी त्यांचे वडील किम जोंग इल उत्तर कोरियात राज्य करत होते. उत्तर कोरियात अतिशय गोपनीय राजकीय व्यवस्था आहे. बंद खोलीत काही लोक मिळूनच निर्णय घेतात त्यात किम जू ए त्यांच्या वडिलांची उत्तराधिकारी असेल की नाही हे आता सांगता येत नाही. परंतु संभाव्य यादीत तिचे नाव सर्वात आघाडीवर असल्याचे सगळेच सांगतात. किम जोंग उन यांना ३ मुले आहेत. त्यातील मोठ्या मुलाचे नावही उत्तराधिकारी म्हणून पुढे येते परंतु सार्वजनिक ठिकाणी कधीही त्यांना पाहिले गेले नाही. किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंग संभाव्य उत्तराधिकारी मानले जात होते परंतु अलीकडच्या काळात त्यांचेही कार्यक्रमात दिसणे कमी झाले आहे. 

कसा आहे वोनसान कलमा बीच?

उत्तर कोरियाच्या उत्तरेकडील वोनसान कलमा सागरी किनारा नवीन पर्यटन स्थळ बनले आहे. कोरिया सध्या पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातूनच हा सागरी किनारा विकसित केला गेला आहे. नैसर्गिक सौंदर्य, आधुनिक वास्तूकला यासाठी हा परिसर ओळखला जातो. उत्तर कोरियातील आर्थिक आणि सांस्कृतिक महत्त्व यातून दिसून येते. याठिकाणी अत्याधुनिक हॉटेल, वॉटरपार्क आणि २० हजार लोकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी परदेशी पर्यटकांमध्ये केवळ रशियातील नागरिकांना येण्याची परवानगी आहे. 

टॅग्स :north koreaउत्तर कोरियाrussiaरशिया