शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 16:23 IST

चीन आणि भारत यांच्यातील सीमावादही अजून सुरू आहे. त्यात रशियाचा हा प्लॅन भारतासाठीही चिंतेचा विषय आहे

रशिया आणि चीन मिळून एका खतरनाक प्लॅनवर काम करत आहेत. रशियाने या वर्षी कमीत कमी ६०० चिनी सैनिकांना प्रशिक्षण देण्याची योजना आखली आहे. US आणि NATO यांच्या शस्त्रांचा मुकाबला करण्यासाठी रशिया-चीनने हात मिळवला आहे. युक्रेनी मीडियात एका रिपोर्टनुसार हा खुलासा करण्यात आला आहे. रशिया चिनी सैनिकांना त्यांची ट्रेनिंग सैन्य तळांवर देणार आहे. या ट्रेनिंगमध्ये रशिया चिनी सैनिकांना ते सगळे डावपेच शिकवणार आहे जे रशियाने युक्रेनसोबतच्या युद्धात वापरले आहेत असं द कीव पोस्टमध्ये म्हटले आहे.

चिंतेची बाब म्हणजे पाकिस्ताननेही हेच डावपेच आखणे सुरू केले आहे. अलीकडेच चीनने पाकिस्तानातील लढाऊ विमान उडवणाऱ्या पायलटना J 35 स्टील्थ फायटर जेट चालवण्याची ट्रेनिंग दिली आहे. त्याशिवाय पाकिस्तानी सैन्याला चीनमध्ये प्रशिक्षण दिले जात असल्याचेही पुढे आले आहे मात्र पाकिस्तानने या बातमीचे खंडन केले होते. रिपोर्टनुसार, चिनी सैनिकांना पाश्चिमात्य शस्त्रांशी मुकाबला करण्यासाठी ट्रेनिंग दिले जात आहे. त्यात एअर डिफेन्स स्पेशालिस्ट, इंजिनिअर, टँक चालवणारे, तोफ तयार करताना विशेष लक्ष दिले जाईल. रशिया आणि चीन यांच्या या मैत्रीने संरक्षण तज्ज्ञही चिंतेत आहेत. चीन या रणनीतीचा फायदा तैवानसारख्या विरोधकांवर हल्ला करण्यासाठी घेऊ शकतो असं त्यांना वाटते. 

भारतालाही टेन्शन

चीन आणि भारत यांच्यातील सीमावादही अजून सुरू आहे. त्यात रशियाचा हा प्लॅन भारतासाठीही चिंतेचा विषय आहे कारण चीनची हजारो किमी सीमा भारतासोबत आहे ज्यातील अनेक जागांवर सध्या वाद आहे. युक्रेनी राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी मागील महिन्यातच सांगितले होते की, चीनने कीव आणि दुसऱ्या युरोपीय देशांना ड्रोन विकणे बंद केले आहे परंतु रशियाला अजूनही ड्रोन पाठवत आहे. सुरुवातीला युक्रेन रशियासोबतच्या युद्धात DJI Mavic सारख्या चिनी ड्रोनवर निर्भर होता. मात्र आता हे ड्रोन रशियासाठी खुले आहे आणि युक्रेनसाठी बंद केलेत. याचा अर्थ चीन एकप्रकारे रशियाची मदत करत आहे.

चीन-रशिया मिळून बनवतंय अटॅक ड्रोन

युक्रेन ड्रोन बनवण्यासाठी त्यांच्या सहकारी देशांवर अवलंबून आहे. २४ तासांत ३०० ते ५०० ड्रोन बनवणे त्यांचे लक्ष्य आहे. आमच्या उत्पादन क्षमतेत समस्या नाही परंतु आर्थिक बजेट अडचण आहे असं युक्रेनी राष्ट्रपतींनी सांगितले. चीन आणि रशिया मिळून अटॅक ड्रोन बनवत असल्याच्या बातम्याही समोर आल्या. चीन अजूनही काही गोष्टीत जसं की, मिसाईल, पाणबुडी, इलेक्ट्रॉनिक युद्धात आणि प्रगत सैन्य तंत्रज्ञानात रशियावर निर्भर असल्याचे तज्त्र सांगतात. रशिया-युक्रेन युद्धात चीन भलेही तटस्थ राहिल्याचे दाखवत असेल तरी विचारधारेत चीन रशियासोबत आहे. 

पाकिस्तानी फौजही घेतेय चीनची मदत

२०२१ मध्ये एका रिपोर्टमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या काही तुकड्या चीनमध्ये ट्रेनिंग घेत असल्याचे बोलले जात होते. पाकिस्तानी सैन्य अधिक उंचीच्या युद्धभूमीवर त्यांची क्षमता वाढवण्यासाठी नवीन सैन्य दल बनवत आहे. ज्यात गिलिगिट बाल्टिस्तानातील लोकांची भरती केली गेली. या स्पेशलाइज्ज हाय एल्टीट्यूड वॉरफेअर बटालियन नावाने ओळखले जाते. चीन त्यांना ट्रेनिंग देत आहे. नुकतेच पाकिस्तानी पत्रकार आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या निकटवर्तीयांनी दावा केलाय की, पाकिस्तानी लढाऊ विमानाचे पायलट J 35 स्टील्थ फायटर जेटचे ट्रेनिंग घेत आहेत.  

टॅग्स :russiaरशियाchinaचीनIndiaभारतAmericaअमेरिका