शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Russia Plane Crash: रडारवरून गायब, घनदाट जंगलात कोसळले; रशियन विमान अपघाताचे कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 14:35 IST

Russia Plane Crash:  रशियाच्या अमूर प्रदेशात सुमारे ५० जणांना घेऊन जाणारे अँटोनोव्ह एएन-२४ प्रवासी विमान कोसळले. या अपघातात कोणीही वाचण्याची शक्यता नाही. विमानाचे अवशेष जंगलात जळताना आढळले आहेत.

Russia Plane Crash: रशियामध्ये प्रवासी विमानाचा भीषण अपघात झाला. या विमानाचा उड्डाणानंतर काही वेळातच नियंत्रण कक्षासोबत संपर्क तुटला. अँटोनोव्ह एएन-२४ प्रवासी विमान होते. विमानात सुमारे ५० लोक होते. या अपघातामध्ये सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 

Russia Plane Crash: रशियात बेपत्ता विमान कोसळले, अपघातानंतर स्फोट; पाच चिमुकल्यांसह ४३ जण ठार

विमानाचे अवशेष जंगलात जळताना आढळले. हेलिकॉप्टरमधून घेतलेल्या फोटोंमध्ये विमानाचा पुढचा भाग आगीच्या ज्वाळांनी वेढलेला दिसतो. बचाव पथके घटनास्थळी पोहोचत आहेत, पण परिस्थिती अत्यंत कठीण आहे.

हे विमान सायबेरियन एअरलाइन्स अंगारा यांचे होते. हे विमान ब्लागोवेश्चेन्स्कहून टिंडा येथे जात होते. हे विमान १९७६ मध्ये तयार केले होते. विमान सोव्हिएत काळातील होते. टिंडा येथे पोहोचताच हे विमान अचानक रडारवरून गायब झाले.

अपघाताचे कारण काय?

खराब हवामान आणि क्रूची चूक या अपघाताचे कारण असल्याचे मानले जात आहे. "खराब दृश्यमानतेमध्ये लँडिंग करताना क्रूने चूक केली, यामुळे हा अपघात झाल्याचे, रशियन वृत्तसंस्था TASS ने म्हटले आहे. 

विमानाचे अवशेष टिंडा पासून १५ किलोमीटर अंतरावर एका टेकडीवर आढळले. "रोसावियात्सिया येथील एका एमआय-८ हेलिकॉप्टरने एक विमान जळत असल्याचे पाहिले.

चीनच्या सीमेजवळ अपघात

हा अपघात चीनच्या सीमेला लागून असलेल्या ठिकाणी झाला आहे. बचाव पथके अजूनही अपघातस्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, पण घनदाट जंगले आणि आगीमुळे बचाव प्रयत्नांमध्ये अडथळा येत आहे. रशियन अधिकाऱ्यांनी अपघाताची चौकशी सुरू केली आहे. विमान अमूर प्रदेशातील टिंडा या लहान शहराकडे जात होते. हा परिसर चीनच्या सीमेला लागून आहे.

टॅग्स :russiaरशियाairplaneविमान