शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

रशियाने युक्रेनच्या दोन शहरांवर केला क्षेपणास्त्र हल्ला, एका मुलासह ४ जण ठार, ४२ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 08:34 IST

Russia-Ukraine War: गेल्या वर्षी २७ जून २०२२ रोजी क्रेमेनचुकवर रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात एका शॉपिंग मॉलमध्ये 22 लोकांचा मृत्यू झाला होता.

किव : रशियाने मंगळवारी युक्रेनमधील क्रेमेनचुक आणि क्रामाटो‌र्स्क या दोन शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले केले.  क्रामाटो‌र्स्क मध्यभागी असलेल्या सर्वात व्यस्त ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ल्यात एका मुलासह एकूण चार लोक ठार झाले, तर ४२ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 

एका स्थानिक अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. वृत्तसंस्था एएफपीने पोलिसांच्या हवाल्याने सांगितले की, रशियाने क्रामाटो‌र्स्क शहरावर पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी दोन एस-३०० क्षेपणास्त्रे डागली. युक्रेनच्या आपत्कालीन सेवेने टेलिग्रामवर या हल्ल्यात ४२ जण जखमी झाल्याची माहिती दिली.

डोनेट्स्क प्रदेशाच्या लष्करी प्रशासनाचे प्रमुख पावलो किरिलेन्को यांनी सांगितले की, रशियाचा युक्रेनवर हल्ला मंगळवारी स्थानिक वेळेनुसार साडेसात वाजता झाला. आम्ही जखमी आणि मृतांची संख्या जाणून घेत आहोत, असेही ते म्हणाले. ज्या ठिकाणी हल्ला झाला ते ठिकाण शहराच्या मध्यभागी असून येथे नागरिकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

युक्रेनियन अधिकार्‍यांचा हवाला देत सीएनएनने वृत्त दिले आहे की, रशियाने क्रेमेनचुकमधील एका गावात दुसरा हल्ला केला. मात्र, यादरम्यान क्षेपणास्त्र गावाबाहेर पडले.  याचबरोबर, युक्रेनचे गृहमंत्री इहोर क्लिमेंको यांनी टेलिग्रामवर सांगितले की, रशिया जाणीवपूर्वक लोकसंख्या असलेल्या भागांना लक्ष्य करत आहे. दरम्यान, गेल्या वर्षी २७ जून २०२२ रोजी क्रेमेनचुकवर रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात एका शॉपिंग मॉलमध्ये 22 लोकांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाInternationalआंतरराष्ट्रीय