शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ड्रोन, मिसाईलचा वर्षाव, अनेक प्रमुख शहरांमध्ये स्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 13:26 IST

Russia attacks Ukraine Kyiv: युक्रेनची राजधानी कीव यासह डस्सा, विनितसिया, झापोरिझिया, क्रेमेनचुक, डनिप्रो, ख्मेलनित्स्की, क्रोपिव्हनित्स्की, क्रिवी रिह या शहरांवरही झाले हल्ले

Russia attacks Ukraine Kyiv: रशियन सैन्याने युक्रेनवर मोठा हवाई हल्ला केला. सोमवारी सकाळी रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला. युक्रेनियन न्यूज पोर्टल द कीव इंडिपेंडंटने आपल्या वृत्तात म्हटले आहे की २६ ऑगस्टला सकाळी राजधानी कीव आणि युक्रेनच्या इतर शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले. रशियाकडून मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या आधारे हे स्फोट घडवून आणण्यात आले. त्यामुळे सकाळीच देशभरात हवाई हल्ले झाले. कीव व्यतिरिक्त, जवळच्या शहरांमध्ये देखील जोरदार हल्ले झाले.

अहवालात दावा करण्यात आला आहे की, सकाळी साडे आठ वाजता शहरात स्फोट ऐकले आणि काही मिनिटांनंतर आणखी अनेक स्फोट ऐकू आले. खार्किवमध्येही स्फोट ऐकू आले, असे शहराचे मेयर इहोर तेरेखोव्ह यांनी सांगितले. कीव व्यतिरिक्त, डस्सा, विनितसिया, झापोरिझिया, क्रेमेनचुक, डनिप्रो, ख्मेलनित्स्की, क्रोपिव्हनित्स्की, क्रिवी रिह येथेही हल्ले झाल्याची माहिती आहे.

युक्रेनियन हवाई दलाने ११ रशियन बॉम्बर तसेच रशियन कामिकाझे ड्रोनची सूचना दिली होती. यानंतर हवाई दलाने अनेक क्षेपणास्त्रे डागणार असल्याचे सांगितले. मात्र, नंतर युक्रेनच्या हवाई दलाने रशियन बॉम्बरची संख्या ११ नसून सहा असल्याचे सांगितले. युक्रेनने म्हटले आहे की, रशियन सैन्याने मोठ्या प्रमाणावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागून त्यांच्या विभागाला लक्ष्य केले आहे. हे युद्ध फेब्रुवारी २०२२ पासून सुरू आहे. पण अलीकडच्या काळात ते युद्ध अधिक भीषण होत चालले आहे. युक्रेनने अलीकडेच रशियाचा मोठा प्रदेश ताब्यात घेतला होता. तसेच युक्रेनच्या लष्कराने अलीकडेच रशियातील साराटोव्ह शहरातील सर्वात मोठ्या इमारतीवर ड्रोनने हल्ला करून मोठे नुकसान केले होते. युक्रेनने रशियाच्या साराटोव्ह भागातील दोन प्रमुख शहरांवर ड्रोन हल्ले केले. यानंतर रशिया पलटवार करेल असे मानले जात होते. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे रशियाने युक्रेनवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाBlastस्फोट