शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 16:01 IST

रशिया त्यांच्या धोरणात बदल करत नाही. तो सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट करत आहे. आता हे युद्ध केवळ युक्रेनचं राहिले नाही तर मानवतेविरोधात युद्ध आहे असं युक्रेननं म्हटलं.

२०२२ पासून रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध २०२५ मध्ये अधिक आक्रमक झालं आहे. काही दिवसांपूर्वी युक्रेनने रशियाच्या ४ एअरबेसवर ड्रोन हल्ले करत त्यांची ४० लढाऊ विमाने उद्ध्वस्त केली होती. आतापर्यंत झालेल्या हल्ल्यांपैकी रशियातील हा हल्ला सगळ्यात मोठा होता. त्यामुळे याचा बदला घेणारच असा पवित्रा पुतिन यांनी घेतला. आता रशियाने युक्रेनच्या सर्व प्रमुख परिसरात ४०० हून अधिक ड्रोन आणि ४० हून जास्त बॅलेस्टिक मिसाईलने प्रतिहल्ला केला आहे. रशियाने केलेल्या या हल्ल्याने युक्रेन हादरले आहे.

रशियाने ज्या भागावर हल्ला केला त्यात वोलिन, लविव, टेरनोपिल, किव, सुमी, पोल्टावा, खमेलनित्सकी, चर्कासी, चेर्निहिव यांचा समावेश आहे. युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी ट्विट करून रशियाच्या हल्ल्याविरोधात युक्रेनी हवाई दलाने अनेक मिसाईल, ड्रोन नष्ट केले आहेत परंतु या हल्ल्यात ३ आपत्कालीन सेवा कर्मचाऱ्यांचे मृत्यू आणि ४९ हून अधिक लोक जखमी आहेत. मलबा हटवण्याचं काम सुरू असून बचाव पथकांनी शोध मोहिम हाती घेतली आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच रशिया त्यांच्या धोरणात बदल करत नाही. तो सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट करत आहे. आता हे युद्ध केवळ युक्रेनचं राहिले नाही तर मानवतेविरोधात युद्ध आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर रशियाला जबाबदार धरले पाहिजे. अमेरिका, युरोप आणि संपूर्ण जगाला आता निर्णायक दबाव बनवावा लागेल. जर जागतिक नेते गप्प बसले तर तेदेखील यात सामील असतील. आता निर्णायक पाऊले उचलण्याची वेळ आली आहे. केवळ समर्थनाने युद्ध थांबणार नाही असंही वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी म्हटलं.

रशिया-युक्रेनवर जागतिक भूमिका 

युक्रेनने सुरूवातीपासून हे स्पष्ट केले आहे की, ते एकटे लढून लढून थकले आहेत. त्यांनी नाटो, युरोपीय संघ, अमेरिका आणि इतर देशांकडून रशियावर आणखी कठोर आर्थिक निर्बंध लावण्याची मागणी करत शस्त्रे, सैन्य मदत पुरवा असं म्हटलं आहे. युक्रेनला रशियाविरोधात युद्धात अनेकांनी मदत केली आहे. अमेरिकेकडून सातत्याने सुरक्षा पॅकेज दिले जात आहे. युरोपने एडवान्स डिफेन्स एअर सिस्टम देण्यात आली आहे. नाटो देशांनी सीमेवर चोख देखरेख ठेवली आहे. तरीही या युद्धात ठोस मदत मिळत नसल्याची भावना झेलेन्स्की यांची आहे. २०२२ पासून आतापर्यंत रशिया आणि यु्क्रेनचे हजारो लोक मारले गेलेत. लाखो लोक विस्थापित झालेत. युक्रेनची अर्थव्यवस्था ढासळली आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन