शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

संयुक्त राष्ट्रानं पाकिस्तानवर बंदी घातल्यास रशिया आणि चीन करणार व्हेटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 20:35 IST

पाकिस्तान नेहमीच दहशतवाद्यांना आश्रय देत आलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेनंही पाकिस्तान विरोधी सूर लावला आहे. जर अमेरिकेनं संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर आर्थिक प्रतिबंध लावण्यासारखं कोणतंही कठोर पाऊल उचललं, तर रशिया आणि चीन त्याला विरोध करणार आहे. अमेरिकेनं संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानविरोधात प्रस्ताव ठेवल्यास रशिया आणि चीन व्हेटोच्या माध्यमातून त्याला विरोध दर्शवणार आहे.

वॉशिंग्टन, दि. 13 - पाकिस्तान नेहमीच दहशतवाद्यांना आश्रय देत आलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेनंही पाकिस्तान विरोधी सूर लावला आहे. जर अमेरिकेनं संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर आर्थिक निर्बंध लावण्यासारखं कोणतंही कठोर पाऊल उचललं, तर रशिया आणि चीन त्याला विरोध करणार आहे. अमेरिकेनं संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानविरोधात प्रस्ताव ठेवल्यास रशिया आणि चीन व्हेटोच्या माध्यमातून त्याला विरोध दर्शवणार आहे.दहशतवाद्यांना आश्रय देणा-या पाकिस्तानच्या समर्थनार्थ आता चीन आणि रशिया मैदानात उतरले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना देण्यात येणा-या संरक्षणावर टीका केली होती. त्यानंतर पाकिस्तान आणि अमेरिकेमध्ये संबंध बिघडले होते.एका रिपोर्टनुसार, अमेरिकेनं दहशतवाद्यांशी कथित स्वरूपात संबंध असणा-या पाकिस्तानी अधिका-यांवर निर्बंध लादण्याचे संकेत दिले आहेत. तसेच या प्रकाराला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खान अब्बासी यांनीही विरोध दर्शवला आहे. पाकिस्तानी अधिका-यांवर प्रतिबंध लादून अमेरिकेच्या दहशतवाद विरोधी प्रयत्नांना कोणत्याही प्रकारची मदत मिळणार नाही, असं वृत्त एक्स्प्रेस ट्रिब्यूननं दिलं आहे.पाकिस्तान यासंबंधी व्हेटोची ताकद असणा-या चीन आणि रशियासारख्या शक्तिशाली देशांच्या संपर्कात आहे. ज्यांनी पाकिस्तानवर अनावश्यक दबाव टाकण्यास अमेरिकेच्या नीतीला विरोध दर्शवला आहे. रिपोर्टनुसार, दोन्ही महाशक्तींनी पाकिस्तानला हरेक प्रकारे मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. रिपोर्टनुसार, पाकिस्तान फ्रान्स आणि ब्रिटनसारख्या पश्चिमी देशांशीची संपर्क साधणार आहे. अमेरिका विदेश नीती, सुरक्षा अधिकारी आणि अमेरिकी सरकारमधील वरिष्ठ अधिकारी वॉशिंग्टनमध्ये नवी विदेश नीती बनवण्यासंदर्भात विचारविमर्श करत आहेत. अमेरिकेचं नवं परराष्ट्र धोरण अंमलात आल्यास ट्रम्प प्रशासन आणि पाकिस्तानी अधिका-यांसोबत कोणत्याही प्रकारची उच्चस्तरीय बैठक होणार नाही. मात्र अमेरिकेचे राजदूत डेव्हिड हालेंनी इस्लामाबादमधील पाकिस्तानी नागरिक व सैन्य अधिका-यांची भेट घेतली आहे. त्यामुळेच पाकिस्ताननं इतर देशांचं समर्थन मिळवण्याचा प्रयत्न चालवला आहे.