शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

2024 मध्येही पुतिनच होणार रशियाचे राष्ट्रपती? क्रेमलिननं केला मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 22:14 IST

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले, सध्या राष्ट्रपती पुतीन यांनी आपली उमेदवारी जाहीर केलेली नाही, पण...

व्लादिमीर पुतिन पुन्हा एकदा रशियाचे राष्ट्रपती होऊ शकतात. आगामी 2024 मध्ये रशियात राष्ट्रपतीपदासाठी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत पुतिन यांना आव्हान देण्यासाठी कुणीही नसल्याचा दावा क्रेमलिनने केला आहे. यासंदर्भात बोलताना क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले, सध्या राष्ट्रपती पुतीन यांनी आपली उमेदवारी जाहीर केलेली नाही. मात्र ते निवडणुकीच्या मैदानात उतरले, तर त्यांना आव्हान देणारे कुणीही नाही. सध्या देशातील जनता पूर्णपणे राष्ट्रपती पुतीन यांच्या पाठीशी असल्याचा दावाही पेस्कोव्ह यांनी केला आहे.

20 वर्षांचा शासन काळ - व्लादिमीर पुतीन यांच्यासंदर्भात बोलायचे झाल्यास, ते एक माजी केजीबी एजन्ट होते. पुतिन हे गेल्या दोन दशकांपासून, कधी पंतप्रधान तर कधी राष्ट्रपती म्हणून राष्ट्राध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसलेले आहेत. गेल्या वर्षी रशियाने युक्रेनवर हल्ल्या केला. मात्र, हा हल्ला पुतीन यांच्या योजनांनुसार राहिला नाही. आपण युक्रेनवर सहज विजय मिळवू, असे त्यांना वाटत होते. पण रशियाला अनेक आघाड्यांवर आव्हानांना सामोरे जावे लागले आहे.

याशिवाय, पुतिन यांना वॅगनर ग्रुपच्या विद्रोहाचाही सामना करावा लागला आहे. महत्वाचे म्हणजे, युक्रेनवरील हल्ल्यानंतर, पाश्चिमात्य देशांनी रशियासंदर्भात अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. याशिवाय पाश्चिमात्य देशांनी रशियावर 2.1 ट्रिलियन डॉलरचे आर्थिक निर्बंधही  लादले आहेत.

ओपिनियन पोल्समध्येही पुतिन आघाडीवर -पुतिन यांच्या लोकप्रियतेसंदर्भात बोलायचे झाल्यास, रशियामध्ये नुकत्याच झालेल्या ओपिनियन पोल्समध्ये, पुतीन रशियातील सर्वात लोकप्रिय नेते असल्याचे म्हटले आहे. लेवाडा सेंटरनुसार, ऑगस्ट महिन्यात पुतिन यांचे अप्रूव्हल रेटिंग 80 टक्के एवढे होते. जे युक्रेन युद्धापूर्वीपेक्षाही चांगले होते. युक्रेनवरील हल्ल्यासंदर्भातत रशियातील सुमारे 70 टक्के लोकांनी देशाला समर्थन दिले आहे. मात्र दुसऱ्या बाजूला, अशा प्रकारच्या पोलवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही, असे विरोधी पक्षांचे नेते आणि पाश्चात्य राजनयिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाElectionनिवडणूक