शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

 RS-28 Sarmat Missile By Russia: दोनदा विचार करा! 10 टनांचे अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या शक्तीशाली मिसाईलची चाचणी; पुतीन यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 23:28 IST

या मिसाईलच्या चाचणीनंतर पुतीन यांनी आम्हाला धमकी देणाऱ्या देशांनी यापुढे दोनदा विचार करावा, असा इशारा दिला आहे.

युक्रेन युद्धाच्या काळात रशियाने एका शक्तीशाली मिसाईलची यशस्वी चाचणी केली आहे. यामुळे अमेरिकेसह जगभरात खळबळ उडाली आहे. रशियाने आरएस-28 सरमत मिसाईलची चाचणी घेतली आहे. हे असे मिसाईल आहे जे आपल्यासोबत हजारो किमींवर १० टन एवढी स्फोटके वाहून नेऊ शकते. ही अण्वस्त्रेदेखील असू शकतात. 

या मिसाईलची रेंजच १८ हजार किमी आहे. या मिसाईलच्या चाचणीनंतर पुतीन यांनी आम्हाला धमकी देणाऱ्या देशांनी यापुढे दोनदा विचार करावा, असा इशारा दिला आहे. पुतिन म्हणाले की, सरमत आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. हे खरोखरच एक अद्वितीय शस्त्र आहे, जे आपल्या सशस्त्र दलांची लढाऊ क्षमता मजबूत करेल. आता आपल्या देशाला धमक्या देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी दोनदा विचार केला पाहिजे.

RS-28 हे सरमत सुपरहेवी इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. क्षेपणास्त्राची निर्मिती रशियन कंपनी मेकेयेव रॉकेट डिझाईन ब्युरोने केली आहे. या क्षेपणास्त्राची चाचणी आणि निर्मिती २००९ पासूनच सुरु होती. मात्र, ते रशियन फौजांच्या सेवेत आणण्यात आले नव्हते. अमेरिकेने काही दिवसांपूर्वी अशाच एका क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. यानंतर रशियानेही ही चाचणी घेत अमेरिकेला प्रत्यूत्तर दिले आहे. या क्षेपणास्त्राचे महत्वाचे वैशिष्ट म्हणजे ते एकाचवेळी किंवा दोन टप्प्यांत १० ते १५ लक्ष्यांना भेदू शकते. या मिसाईलवर १० ते १५ वॉरहेड लादता येतात. 

वेग एवढा की...हे मिसाईल एवढ्या प्रचंड वेगाने झेपावते की तासाला ते 25560 किमीचे अंतर पार करू शकते. आणखी  एक महत्वाची बाब म्हणजे हे मिसाईल एस-400 सारख्या मिसाईल लाँचरमधून लाँच केले जाऊ शकते. एस-400 ही डिफेन्स सिस्टिम आहे जी भारतालाही मिळाली आहे. या मिसाईलचे उद्घाटन 1 मार्च 2018 ला पुतीन यांनी केले होते. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन