शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
3
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
4
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
5
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
6
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
7
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
8
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
9
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
10
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
11
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
12
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
13
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
14
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
15
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
16
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
17
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
18
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
19
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
20
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास

रोहिंग्या समस्या ; म्यानमारमधील हिंदूंवरही छावणीत राहण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 12:56 IST

कॉक्स बझारमधील मोठ्या छावणीच्या बाहेर हिंदू कुटुंबांना ठेवण्यात आले आहे. कॉक्स बझारमधील या छावणीमध्ये 11 लाख लोक राहात असल्याचे सांगण्यात येते. गेल्या वर्षी 26 ऑगस्ट रोजी म्यानमारमध्ये लष्कराने रोहिंग्यांवर कारवाई सुरु केली

कॉक्स बझार- गेल्या वर्षी म्यानमारच्या लष्कराने केलेल्या कारवाईमध्ये लाखो रोहिंग्यांनी रखाइन प्रांत सोडून बांगलादेशाच्या दिशेने पलायन केले. हे रोहिंग्या सध्या कॉक्स बझारमधील छावणीमध्ये राहात आहेत. रखाइन प्रांतामध्ये रोहिंग्यांबरोबर हिंदू कुटुंबेही राहात होती. त्यांना रोहिंग्या हिंदू असे संबोधले जाते. मुस्लीम रोहिंग्यांबरोबर या हिंदूंनाही जीव मूठीत धरुन बांगलादेशात यावे लागले. सध्या बांगलादेशातील कॉक्स बझारच्या जगातील सर्वात मोठ्या निर्वासीत छावणीमध्ये 101 हिंदू कुटुंबे राहात आहे. लष्करी कारवाईमुळे त्यांची मोठी फरपट झालेली आहे.

कॉक्स बझारमधील मोठ्या छावणीच्या बाहेर हिंदू कुटुंबांना ठेवण्यात आले आहे. कॉक्स बझारमधील या छावणीमध्ये 11 लाख लोक राहात असल्याचे सांगण्यात येते. गेल्या वर्षी 26 ऑगस्ट रोजी म्यानमारमध्ये लष्कराने रोहिंग्यांवर कारवाई सुरु केली. या कारवाईमध्ये अनेक लोकांचे प्राण गेले तसेच लष्कराकडून महिलांवर बलात्कार होण्याच्या घटनाही घडल्या. त्यामुळे रोहिंग्यांबरोबर हिंदूही पळून गेले.

बांगलादेशातील छावणीत हिंदूंच्या वसाहतीजवळ सतत पोलीस पहारा ठेवण्यात आलेला आहे. रंगीत साड्या नेसलेल्या तसेच बांगड्या व कुंकू लावलेल्या महिलांमुळे यांचा परिसर इतर छावणीपेक्षा वेगळा दिसून येतो. तसेच बांबू आणि ताडपत्री वापरून येथे राधाकृष्णाचे एक साधे मंदिरही या लोकांनी तेथे उभे केले आहे. जर छावणीमध्ये काही गोंधळ निर्माण झाला तर या कुटुंबा संरक्षण देणे अवघड होईल म्हणून बांगलादेश सरकारने या कुटुंबांना छावणीच्या बाहेरच ठेवलेले आहे.

1982 साली म्यानमारमध्ये नागरिकत्त्वाचा एक कायदा संमत करण्यात आला. या कायद्यानुसार 8 वेगवेगळ्या वंशाच्या लोकांचे नागरिकत्त्व बेकायदेशीर ठरवण्यात आले. तेव्हापासून सतत रोहिंग्या व स्थानिक म्यानमारी लोक यांच्यामध्ये तणावाचे वातावरण तयार होऊन हिंसाचाराच्या घटना घडत गेल्या, 1992 साली म्यानमारमधून काही हजार रोहिंग्या बांगलादेशात पळून गेले होते. पलायनाच्या या घटना आतापर्यंत सुरुच राहिल्या.हिंदू छावणीचा माझी म्हणजे नेता शिशू शील नावाचा 32 वर्षांचा युवक आहे. रखाइन प्रांतातील मांगटाऊ जिल्ह्यातून त्याने गेल्या 28 ऑगस्ट रोजी पलायन केले होते. द हिंदू या भारतीय वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपल्यावर ओढावलेल्या प्रसंगाची माहिती दिली. त्याच्या चिकनचारी या संपूर्ण गावानेच पलायन केल्याचे तो सांगतो. त्याच्या गावाच्या शेजारील फकिराबझार येथे लष्कराने केलेल्या कारवाईत 86 हिंदूंचे प्राण गेल्याचे तो सांगतो. आता कॉक्सबझारमधील या हिंदू कॅम्पमध्ये पाल व शील नावाच्या पंथाचे लोक राहात आहेत. म्यानमार सरकारने त्यांना नॅशनल व्हेरिफिकेशन कार्ड दिले आहे त्यावर त्यांचा वंश भारतीय असे नमूद करण्यात आले आहे. शिशू शील म्हणतो, माझे आजोबा  तिकडे स्थायिक झाले होते, तेव्हापासून आमचे कुटुंब म्यानमारमध्येच आहे, पण आमच्याकडे भारतातून आलेले पाहुणे अशाच नजरेने पाहिले गेले. आम्हाला नागरिकत्त्व मिळालेच नाही.

टॅग्स :Rohingyaरोहिंग्याBangladeshबांगलादेशMyanmarम्यानमारunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ