शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ऋषी सुनक यांची दावेदारी मजबूत, १०० खासदारांचे समर्थन असल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 06:51 IST

निवडणूक लढविण्यासाठी ते कॅरेबियन सुट्टी आटोपून परतले आहेत. सुनक किंवा जॉन्सन यांच्यापैकी कोणीही अद्याप निवडणूक लढविण्याचा इरादा जाहीर केलेला नाही.

लंडन : लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर ब्रिटिश पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचाच दावा सर्वात मजबूत असल्याचे मानले जात आहे. सुनक यांनी आवश्यक १०० खासदारांचा पाठिंबा मिळविल्याचा दावा त्यांच्या पाठीराख्यांनी केला. 

रिंगणात उतरू इच्छिणाऱ्यांची संख्या वाढत असून, यात माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची भर पडली आहे. निवडणूक लढविण्यासाठी ते कॅरेबियन सुट्टी आटोपून परतले आहेत. सुनक किंवा जॉन्सन यांच्यापैकी कोणीही अद्याप निवडणूक लढविण्याचा इरादा जाहीर केलेला नाही.

केवळ हाउस ऑफ कॉमन्सच्या नेत्या पेनी मॉर्डंट यांनीच त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. ब्रिटनचा नवा पंतप्रधान निवडण्यासाठी पुढील दोन दिवस अतिशय महत्त्वाचे आहे.

दुसऱ्या क्रमांकावर जॉन्सनसुनक यांना १०० खासदारांचा पाठिंबा मिळाला असल्याचा दावा करण्यात येत आहे. बोरिस जॉन्सन हे ऋषी सुनक यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत, त्यांच्या बाजूने ४५ खासदार आहेत. त्याच वेळी पेनी मॉर्डंट तिसऱ्या क्रमांकावर आहेत, त्यांना १९ खासदारांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येत आहे. जॉन्सन जर ही शर्यत जिंकून पंतप्रधान झाले, तर ते त्यांचे विलक्षण पुनरागमन असेल. 

टॅग्स :Londonलंडन