शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

नोव्हेंबरपासून इराणविरोधात निर्बंध पूर्णपणे लागू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 06:44 IST

व्हाइट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ट्रम्प यांनी सांगितले की, अणुकरारान्वये मागे घेण्यात आलेले इराणविरोधातील सर्व निर्बंध ५ नोव्हेंबरपासून पुन्हा लागू होतील.

वॉशिंग्टन : इराण विरोधातील सर्व अमेरिकी निर्बंध ५ नोव्हेंबरपासून पूर्णांशाने लागू होतील, अशी घोषणा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. व्हाइट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ट्रम्प यांनी सांगितले की, अणुकरारान्वये मागे घेण्यात आलेले इराणविरोधातील सर्व निर्बंध ५ नोव्हेंबरपासून पुन्हा लागू होतील.हे निर्बंध पूर्ण शक्तीनिशी लावण्यात येतील. हे निर्बंध लागू झाल्यानंतर अधिक कठोर नवे निर्बंध इराणविरुद्ध आणण्यात येतील. आम्ही इराणला दहशतवादाचा प्रसार करू देणार नाही, तसेच घातक शस्त्रास्त्रेही विकसित करू देणार नाही, असेही ट्रम्प म्हणाले आहेत. बराक ओबामा यांनी इराणसोबत अणुकरार केला होता. या करारान्वये इराणविरोधातील निर्बंध मागे घेण्यात आले होते. ट्रम्प यांनी हा करार रद्द केला आहे. त्यानुसार, आता इराणविरोधातील सर्व निर्बंध पुन्हा लागू करण्यात येत आहेत. इराणकडून कच्चे तेल खरेदी करण्यावरही अमेरिकेने निर्बंध घातले आहेत. त्याचा फटका भारताला बसणार आहे. इराणकडून तेल खरेदी करायचे असल्यास भारताला अमेरिकेकडून विशेष सवलत मिळवावी लागेल; अथवा तेल आयत थांबवून शून्यावर आणावी लागेल.लेबनॉनमधील अतिरेकी गट हिज्बोल्लाह विरुद्धही निर्बंध लावण्यात आल्याची घोषणा ट्रम्प यांनी यावेळी केली. त्यांनी सांगितले की, काही क्षणांपूर्वीच मी हिज्बोल्लाहविरुद्ध आणखी कडक निर्बंध लावण्यासाठी एका कायद्यावर स्वाक्षरी केली आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाUSअमेरिकाIranइराण