शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आगडोंब उसळल्यानंतर घटवला आरक्षणाचा टक्का; बांगलादेशात ५६ टक्क्यांऐवजी आता ७% आरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 07:21 IST

आरक्षणावरून देशभरात हिंसाचारादरम्यान पोलिस आणि लष्करावर दगडफेक करताना विद्यार्थी. इन्सेटमध्ये एका पोलिसाला घेरून काठ्यांनी मारहाण करताना विद्यार्थी दिसत आहेत. गुणवत्तेच्या आधारे ९३ टक्के नोकऱ्या दिल्या जातील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

ढाका: आरक्षणावरून देशभरात हिंसाचाराचा आगडोंब उसळल्याने सरकारी नोकऱ्यांमध्ये ५६ टक्के आरक्षण देण्याचा ढाका उच्च न्यायालयाचा निर्णय बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने फिरविला. न्यायालयाने रविवारी आरक्षण ५६% वरून ७% पर्यंत कमी करण्याचा आदेश जारी केला आहे. यामध्ये स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांना ५ टक्के आरक्षण मिळेल, जे यापूर्वी ३० टक्के होते. उर्वरित २% मध्ये जातीय अल्पसंख्याक, ट्रान्सजेंडर आणि अपंग यांचा समावेश असेल.

सरकारने २०१८ मध्ये ५६ टक्के आरक्षण रद्द केले होते, परंतु या वर्षी ५ जून रोजी तेथील उच्च न्यायालयाने सरकारचा निर्णय रद्द केला आणि आरक्षण पुन्हा लागू केले. यानंतर बांगलादेशात हिंसाचार पुन्हा सुरू झाला. या हिंसाचारात आतापर्यंत ११५ लोकांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने आंदोलकांवर दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

मागणी काय होती? नोकांची कमतरता आणि बेरोजगारांची वाढलेली संख्या आणि कमी झालेले उत्पन्न यामुळे हताश झालेले विद्यार्थी संतापले आहेत. मुक्तिसंग्रामात भाग घेतलेल्या कुटुंबांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ३०% सरकारी नोकऱ्या राखून ठेवणारा कोटा संपवण्याची मागणी ते करत होते. यामुळे हिंसाचार पेटला. कोर्टाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा विजय झाला आहे.

भारत-बांगलादेश वाहतूक ठप्प; ७०० ट्रक अडकले बांगलादेशात आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांमुळे मालवाहू ट्रकची वाहतूक थांबली असून, भारत आणि बांगलादेश यांच्यातील व्यापार ठप्प झाला आहे. पेट्रापोल बंदर बंद असल्याने व्यापार ठप्प आहे. दोन्ही देशांचा एक तृतीयांश व्यापार येथून होतो. 

मालदाच्या महादीपूर बंदरातून शनिवारी बांगलादेशात पोहोचलेले मालवाहू ट्रक परतले नसून ते सुरक्षित आहेत. शनिवारी बांगलादेशातून १२० ट्रक भारतात आले, तर ४८ ट्रक बांगलादेशात निर्यातीसाठी गेले. मालाने भरलेले सुमारे ७०० ट्रक पाकिंगमध्ये अडकले असून, ते बांगलादेशला जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

बांगलादेशातील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शेजारील देशातील संकटात सापडलेल्या लोकांसाठी आपल्या राज्याचे दरवाजे उघडे ठेवण्यात आले असून, त्यांना आश्रय दिला जाईल.

९७८ भारतीय विद्यार्थी मायदेशी परतलेबांगलादेशातून आतापर्यंत ९७८ भारतीय विद्यार्थी परतले आहेत. सुमारे ८० विद्यार्थी मेघालयातील आहेत आणि उर्वरित इतर राज्यांतील आहेत. नेपाळ आणि भूतानमधील काही विद्यार्थी आणि पर्यटकांनाही बाहेर काढण्यात आले आहे. तेथील परिस्थिती पाहून विद्याथ्र्याचे पालक चिंतेत आहेत. बांगलादेशात एकूण भारतीय नागरिकांची संख्या सुमारे १५,००० असून, यात सुमारे ८,५०० विद्यार्थी आहेत.- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल

टॅग्स :Bangladeshबांगलादेशreservationआरक्षण