वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येशी संबंधित ३,००० गोपनीय फायली (दस्तावेज) जारी करण्यास अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परवानगी दिली आहे. तथापि, लष्कर आणि गुप्तचर विभागाशी संबंधित काही संवदेनशील दस्तावेज जारी करण्यात आलेले नाहीत. राष्ट्रीय संग्राहालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार २२ नोव्हेंबर १९६३ रोजी केनेडी यांची डलास येथे हत्या झाली होती. केनेडी यांच्या हत्येशी संबंधित २,८९१ फायली जारी करण्यात आल्या आहेत. यावर १८० दिवसांत सखोल अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष केनेडींच्या हत्येसंबंधी गोपनीय फायली जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 05:25 IST