शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारावरील अटी शिथिल केल्यास भारत-नेपाळ मतभेद कमी होतील; माजी उपपंतप्रधानांचा विश्वास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 09:44 IST

भारताने जर आंतरराष्ट्रीय व्यापार करारात लादलेल्या अटी व शर्ती आणखी शिथिल केल्या तर दाेन्ही देशांत रुंदावत चाललेली मतभेदाची दरी कमी होऊन संबंध पूर्ववत होतील, असा विश्वास नेपाळचे माजी उपपंतप्रधान विमलेेंद्र कुमार निधी ‘लोकमत’जवळ व्यक्त केला

नारायण जाधव काठमांडू : एकेकाळी भारताचा सर्वात विश्वासू मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेपाळमधील जनतेच्या  मनात  केंद्र सरकारच्या काही निर्णयांमुळे मतभेदाची दरी रुंदावत चालली आहे. संभाव्य स्थलांतर रोखण्यासाठी भारताने केलेली सीमाबंदी आणि  नंतरच्या काळात दोन्ही देशांतील आंतरराष्ट्रीय व्यापार करारात लादलेल्या अटी व शर्ती कारणीभूत आहेत, असे निरीक्षण नेपाळचे माजी उपपंतप्रधान विमलेेंद्र कुमार निधी यांनी नोंदविले. 

भारताने जर आंतरराष्ट्रीय व्यापार करारात लादलेल्या अटी व शर्ती आणखी शिथिल केल्या तर दाेन्ही देशांत रुंदावत चाललेली मतभेदाची दरी कमी होऊन संबंध पूर्ववत होतील, असा विश्वास त्यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केला. नेपाळच्या मधेसी प्रांतात भारताला अधिक रुची आहे, ते हा नेपाळपासून प्रांत तोडून भारताला जोडतील, असा एक समज वाढत आहे. एकीकडे भारताने व्यापारात अटी व शर्ती लादल्या असताना दुसरीकडे  चीनने मात्र  त्या कमी केल्या  आहेत, यामुळे नेपाळी जनतेच्या मनात चीनविषयी सकारात्मक भावना वाढीस लागली आहे, याकडे विमलेंद्रकुमार निधी यांनी लक्ष वेधले. सध्या  त्यांच्याकडे नेपाळमधील सत्ताधारी नेपाळी नॅशनल  काँग्रेसचे  उपाध्यक्षपद असून नेपाळी सत्ताकेंद्रात त्यांचे मोठे राजकीय वजन आहे. नेपाळमध्ये  सध्या स्थानिक स्वराज्य  संस्थांच्या निवडणुका सुरू असून त्यांनी मुंबईतील पत्रकारांशी संवाद साधला. 

भूकंपाच्या वेळेस भारताने घेतलेल्या भूमिकेमुळे नाराजी नेपाळच्या माजी उपपंतप्रधानांचे माजी माध्यम सल्लागार रामजी दहाल यांच्या मते कालापानी-विपुलेख सीमेवरून जेवढे राजकारण केले जात आहे, ते नेपाळी जनतेसाठी तेवढे महत्त्वाचे नाही. हा दोन्ही देशांतील राजकारण्यांनी तापवलेला मुद्दा आहे. चर्चा करून हा प्रश्न सोडविता येऊ शकतो. मात्र, भूकंपानंतर भारताने नेपाळला पाहिजे तशी मदत तर केली नाहीच, शिवाय वर त्याकाळी सीमाबंदी करून आमच्या जखमेवर मीठ चोळले, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.  आमच्या नव्या घटनेचे भारताने स्वागत करायला हवे होते, असे ते म्हणाले.

भारतासोबतची सीमा सुरक्षितभारतासोबत नेपाळची १८४० किमीची सीमा आहे, ती पूर्णत: सुरक्षित  आहे. इतर देशांसोबतच्या सीमेवर भारत दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च करतो, पण नेपाळला  काय देतो, व्यापारात अटी व शर्ती लादतो, असे निरीक्षण नेपाळच्या पंतप्रधानांचे माजी माध्यम सल्लागार श्रीकृष्ण अनिरुद्ध गौतम यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :IndiaभारतNepalनेपाळ