शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

रोहिंग्यांना परत घेण्यास म्यानमारची अजून पूर्ण तयारी नाही- रेडक्रॉस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 12:57 IST

बांगलादेशातील 7 लाख रोहिंग्यांना परत घेण्यासाठी आपण तयार असल्याचे सांगत म्यानमारने रोहिंग्यांच्या आगमनासाठी दोन केंद्रे तयार केली आहेत. या जागा रखाइन प्रांताच्या सीमेवर आहेत.

चाकमरुल निर्वासित छावणी, बांगलादेश- गेल्या वर्षी लष्करी कारवाईला कंटाळून बांगालदेशात पळालेल्या रोहिंग्यांना परत सामावून घेण्यासाठी म्यानमारची अजून पूर्ण तयारी झालेली दिसत नाही असे मत रेडक्रॉसच्या अध्यक्षांनी व्यक्त केले आहे. रोहिंग्यांच्या परतीसाठी सुरु होणार असलेल्या मोहिमेच्या आधी रेडक्रॉसचे अध्यक्ष पीटर मॉरर यांनी म्यानमारच्या रखाइन प्रांताला भेट दिली. त्यानंतर त्यांनी हे विधान केले आहे.

बांगलादेशातील 7 लाख रोहिंग्यांना परत घेण्यासाठी आपण तयार असल्याचे सांगत म्यानमारने रोहिंग्यांच्या आगमनासाठी दोन केंद्रे तयार केली आहेत. या जागा रखाइन प्रांताच्या सीमेवर आहेत. मात्र पीटर मॉरर यांनी अजूनही म्यानमारतर्फे योग्य तयारी झालेली नाही असे निरीक्षण नोंदवले आहे.

रोहिंग्यांचे माघारी येणे प्रत्यक्षात येण्यासाठी अजून भरपूर काम होणे अपेक्षित आहे. त्यांना आश्रय देण्यासाठी योग्य इमारतींचे बांधकाम व्हायला हवे असे मॉरर यांमी सांगितले. मॉरर यांनी बांगलादेशातील रोहिंग्या छावण्यांना भेट दिली तसेच म्यानमारमधील ओस पडलेल्या खेड्यांच्या स्थितीचीही पाहणी केली. रेड क्रॉसने आजवर रोहिंग्यांना सर्वाधीक मदत पुरवली आहे. रेडक्रॉसच्या रखाइन प्रांतातील कार्याला गती यावी यासाठी आपण म्यानमार सरकार्चाय उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना भेटलो असेही पीटर मॉरर यांनी सांगितले.

म्यानमारमधील हिंदूंवरही छावणीत राहण्याची वेळरखाइन प्रांतामध्ये रोहिंग्यांबरोबर हिंदू कुटुंबेही राहात होती. त्यांना रोहिंग्या हिंदू असे संबोधले जाते. मुस्लीम रोहिंग्यांबरोबर या हिंदूंनाही जीव मूठीत धरुन बांगलादेशात यावे लागले. सध्या बांगलादेशातील कॉक्स बझारच्या जगातील सर्वात मोठ्या निर्वासीत छावणीमध्ये 101 हिंदू कुटुंबे राहात आहे. लष्करी कारवाईमुळे त्यांची मोठी फरपट झालेली आहे. कॉक्स बझारमधील मोठ्या छावणीच्या बाहेर हिंदू कुटुंबांना ठेवण्यात आले आहे. कॉक्स बझारमधील या छावणीमध्ये 11 लाख लोक राहात असल्याचे सांगण्यात येते. गेल्या वर्षी 26 ऑगस्ट रोजी म्यानमारमध्ये लष्कराने रोहिंग्यांवर कारवाई सुरु केली. या कारवाईमध्ये अनेक लोकांचे प्राण गेले तसेच लष्कराकडून महिलांवर बलात्कार होण्याच्या घटनाही घडल्या. त्यामुळे रोहिंग्यांबरोबर हिंदूही पळून गेले. बांगलादेशातील छावणीत हिंदूंच्या वसाहतीजवळ सतत पोलीस पहारा ठेवण्यात आलेला आहे. रंगीत साड्या नेसलेल्या तसेच बांगड्या व कुंकू लावलेल्या महिलांमुळे यांचा परिसर इतर छावणीपेक्षा वेगळा दिसून येतो. तसेच बांबू आणि ताडपत्री वापरून येथे राधाकृष्णाचे एक साधे मंदिरही या लोकांनी तेथे उभे केले आहे. जर छावणीमध्ये काही गोंधळ निर्माण झाला तर या कुटुंबा संरक्षण देणे अवघड होईल म्हणून बांगलादेश सरकारने या कुटुंबांना छावणीच्या बाहेरच ठेवलेले आहे.

टॅग्स :Rohingyaरोहिंग्याBangladeshबांगलादेशunited nationsसंयुक्त राष्ट्र संघMyanmarम्यानमार