शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

रोहिंग्या महिलांवर जवानांचा बलात्कार , म्यानमारमधील २१ महिलांची व्यथा,  बांग्लादेशातील शिबिरांमध्ये आश्रय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 23:50 IST

म्यानमारच्या सशस्त्र दलातील जवानांनी २१ रोहिंग्या महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. बांग्लादेशात निर्वासितांच्या शिबिरात सध्या या महिला आश्रयाला आहेत. या महिलांनीच ही व्यथा मांडली आहे.

उखिया (बांग्लादेश) : म्यानमारच्या सशस्त्र दलातील जवानांनी २१ रोहिंग्या महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. बांग्लादेशात निर्वासितांच्या शिबिरात सध्या या महिला आश्रयाला आहेत. या महिलांनीच ही व्यथा मांडली आहे.तथापि, म्यानमारच्या सैन्याने मात्र असे काही झालेच नसल्याचे स्पष्ट केले आहे. एका १३वर्षाच्या मुलीने सांगितले की, म्यानमारच्या सैन्याची दडपशाही आम्ही अनुभवली आहे. या सैैनिकांनी माझ्या वडिलांची हत्या केली.या सैन्याने कसे अत्याचार केले ते या मुलीने सांगितले. अन्य एका महिलेची व्यथाही अशीच आहे. जूनमध्ये हे दाम्पत्य घरी झोपी गेले असताना सात सैनिक आले आणि त्यांनी या पुरुषाला दोरीने बांधले आणि त्याच्यासमोरच महिलेवर बलात्कार केला.या सैन्याने महिलांवर अतिशय क्रूरपणे अत्याचार केले. अगदीकमी वयाच्या मुली आणि गर्भवतींवरही या सैन्याने अत्याचार केल्याचे समोर येत आहे. अशाकिमान २१ महिला बांग्लादेशातील विविध निर्वासित शिबिरांमध्येआहेत. अशा महिलांची संख्या अधिकही असू शकेल, असा अंदाज आहे. (वृत्तसंस्था)अंगावर शहारे : बांग्लादेशात आश्रयाला असलेल्या या महिलांच्या चेहºयावर आजही ती भीती दिसत आहे. रात्री अपरात्री हे सैनिक येऊन घरच्या पुरुषाला बांधून टाकत असत किंवा त्याची हत्या करत आणि महिलांवर अत्याचार करत होते. या महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलेल्या व्यथा अंगावर शहारे आणणाºया आहेत. घरच्या कर्त्या पुरुषाला झाडाला बांधून मारणे, लहान मुलांनाही मारहाण करणे आणि महिलांवर अत्याचार करण्याची त्यांची पद्धत धडकी भरविणारी होती.

टॅग्स :Crimeगुन्हा