शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-भाजपा आणि डावे, निवडणुकीत कट्टर विरोधक आले एकत्र, या पक्षाविरोधात केली आघाडी   
2
पुतिन यांच्या भारत भेटीने का खूश झाला आहे पाकिस्तानचा 'हा' शेजारी देश? काय फायदा होणार?
3
१२ डिसेंबरपासून उघडतोय 'हा' आयपीओ; आतापासूनच ₹३५० च्या नफ्यावर पोहोचलाय GMP
4
एसयूव्ही कार्स खरेदी करण्यासाठी सुवर्णकाळ! 'या' मॉडेल्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; एकीवर तर ३.२५ लाखांची सूट
5
मुंबई-पुणे विमानासाठी मोजा ६७,५०० रुपये; अन्य कंपन्यांनी प्रवाशांना प्रचंड लुटले
6
लग्नाचे कायदेशीर वय गाठलेले नसले तरीही ते दोघे स्वेच्छेने लिव्ह-इनमध्ये राहू शकतात; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
7
५३१ धावांचं आव्हान, सातव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, विंडीजकडून जोरदार पाठलाग, अखेरीस असा लागला निकाल  
8
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
9
धक्कादायक माहिती! गुजरातमधील मतदार याद्यांत १७ लाख मृतांची नावे
10
घटस्फोटाच्या ४ महिन्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्रीने बांधली दुसऱ्यांदा लग्नगाठ, फोटो आला समोर
11
इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
12
Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळताना रचला इतिहास!
13
डॉ. बाबासाहेबांच्या हयातीतच कोल्हापूरकरांनी अर्धपुतळा उभारून दिली अनोखी मानवंदना!
14
Post Office ची जबरदस्त स्कीम, एकदा पैसे गुंतवा; नंतर व्याजाद्वारेच होईल ५ लाखांची कमाई, जाणून घ्या
15
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
16
देशात रस्ते अपघाताने घेतला १.७७ लाख जणांचा जीव, रस्ते परिवहन-महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
17
सारा खान झाली मिसेस पाठक! क्रिशसोबत बांधली लग्नगाठ; सासरे सुनील लहरी गैरहजर?
18
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
19
लक्ष्य १०० अब्ज डॉलर व्यापाराचे! केवळ तेलविक्री नव्हे तर भारतातील वाहतूक व सेवेचा लाभ घेण्यास रशियन कंपन्या उत्सुक
20
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
Daily Top 2Weekly Top 5

ऑफिस ट्रिप असल्याचं सांगून थायलंडला गेला, तिथे गर्लफ्रेंडसोबत सापडला, असं फुटलं रंगेल नवऱ्याचं बिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 10:10 IST

Thailand News: एक मलेशियन व्यक्ती सहकाऱ्यांसह बिझनेस ट्रिपसाठी जात असल्याचं पत्नीला सांगून मैत्रिणीसोबत थायलंडला फिरायला गेला होता. तिथे हे दोघेही मौजमजा करत असताना अचानक आलेल्या भीषण पुरामध्ये अडकले.  

मौजमजा करण्यासाठी थायलंडला जाणाऱ्या मंडळींची संख्या कमी नाही. त्यातील काही जण तर वेगळेगळी कारणं देऊन थायलंडला जातात. अशीच एक घटना समोर आली आहे. एक मलेशियन व्यक्ती सहकाऱ्यांसह बिझनेस ट्रिपसाठी जात असल्याचं पत्नीला सांगून मैत्रिणीसोबत थायलंडला फिरायला गेला होता. तिथे हे दोघेही मौजमजा करत असताना अचानक आलेल्या भीषण पुरामध्ये अडकले.

सदर व्यक्ती पत्नीसोबत सातत्याने बोलत असल्याने तिलाही त्याच्यावर संशय आला नाही. दरम्यान, मुसळधार पावसामुळे आलेल्या भीषण पुराचा फटका दक्षिण थायलंडला बसला. यात ८० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तसेत दक्षित थायलंडमधील सर्वात मोठं शहर असलेल्या हाय याई सह १२ प्रांतातील ३० लाख लोकांना या पुराचा फटका बसला.

दरम्यान, हाट याई येथील मदतकार्यासंबंधीचे अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या आणि त्या माध्यमातून पुरात अडकलेल्यांची त्यांच्या नातेवाईकांशी भेट घडवून आणणाऱ्या  आपत्ती व्यवस्थापन कार्यकर्ता असलेल्या एक मलेशियन महिलेने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यात या महिलेने लिहिले की, २४ नोव्हेंबर रोजी एका मलेशियन महिलेने तिच्या पतीचा शोध घेण्यासाठी माझ्याकडे मदत मागितली होती. तिचा पती त्याच्या सहकाऱ्यांसह हाट याई शहरामध्ये अडकला असल्याची भीती तिने व्यक्त केली होती.  तसेच तिची लहान मुले वडील घरी कधी येणार याची उत्सुकतेने वाट पाहत होते. दरम्यान, मी त्या शहरात राहणाऱ्या नातेवाईकांच्या मदतीने त्या महिलेचा पतीला एका हॉटेलमधून शोधून काढले.

मात्र सदर व्यक्तीची सहकारी एक महिला होती. आणि हे दोघेही चार दिवसांपासून हॉटेलमधील एकाच खोलीमध्ये राहत होते. या व्यक्तीने या गोष्टीची माहिती आतापर्यंत त्याच्या पत्नीला दिली नव्हती, असेही तिने या पोस्टमध्ये लिहिले.

दरम्यान, बचाव कर्मचारी असलेल्या सदर महिलिने तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून ही माहिती शेअर केली आहे. तसेच महिलांनी अधिक सावध राहावे आणि आपल्या पतींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही तिने केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Man claims business trip, caught in Thailand with girlfriend.

Web Summary : A married man, faking a business trip, was found with his girlfriend in Thailand after a flood. A rescue worker exposed his lie, advising women to be cautious.
टॅग्स :ThailandथायलंडrelationshipरिलेशनशिपInternationalआंतरराष्ट्रीय