शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मन की बात करायला नाही; तर ऐकायला आलोय; दुबईत राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 13:51 IST

राहुल गांधी दोन दिवसांच्या दुबई दौऱ्यावर

दुबई: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस अध्यक्ष दोन दिवसांच्या दुबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राहुल यांनी भारतीय कामगारांशी संवाद साधला. तुम्ही जगभरात भारताचं नाव मोठं करत आहात. तुम्हाला अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे मला तुमची मन की बात ऐकायची आहे. मला 'मन की' बात करण्यात फारसा रस नाही, अशा शब्दांमध्ये कामगारांशी संवाद साधत राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला. तुम्हाला जिथे आमची मदत लागेल, तिथे आम्ही तुम्हाला साथ देऊ, असं आश्वासन यावेळी राहुल यांनी दिलं. राहुल गांधी दुबई विमानतळार पोहोचताच त्यांचं जोरदार स्वागत झालं. दुबईच्या विमानतळावर राहुल-राहुल अशा घोषणाही ऐकू आल्या. राहुल गांधी दुबईनंतर अबूधाबीला जाणार आहेत. या ठिकाणी ते विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना संबोधित करतील. केरळचे माजी मुख्यमंत्री ओमान चंडी आणि काँग्रेस नेते सॅम पित्रोडा या दौऱ्यादरम्यान राहुल यांच्या सोबत आहेत. दुबईत राहुल यांनी अनेक उद्योगपतींची भेट घेतली आहे. राहुल गांधींचा हा दौरा राजकीय नसून तो केवळ अनिवासी भारतीयांच्या संपर्कात राहण्यासाठी आहे, अशी माहिती राहुल यांच्या सोबत असलेल्या टीमनं दिली. दुबई, अबूधाबीतील शहरांमध्ये भारतीय कामगारांची संख्या मोठी आहे. यातील बहुतांश कामगार दक्षिण भारतातले आहेत. या कामगारांच्या भेटीगाठींशिवाय राहुल गांधी दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये होणाऱ्या इंडो-अरब कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात त्यांना मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आलं आहे. राहुल गांधी उद्या अबूधाबीला जाणार असून तिथे ते संयुक्त अरब अमिरातच्या मंत्र्यांची भेट घेणार आहेत. यानंतर ते इंडियन बिझनेस ग्रुपच्या सदस्यांशी संवाद साधणार आहेत.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीDubaiदुबईNarendra Modiनरेंद्र मोदी