शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

रघुराम राजन होणार बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 17:16 IST

गव्हर्नरपदाच्या शर्यतीत राजन यांचं नाव आघाडीवर

लंडन: भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची लवकरच इंग्लंडच्या मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदाच्या शर्यतीत राजन यांचं नाव आघाडीवर आहे. ब्रेक्झिटमुळे इंग्लंडची अर्थव्यवस्था अडचणीत सापडली आहे. त्यामुळेच गव्हर्नरपदासाठी राजन यांच्या नावाचा विचार केला जात आहे. 325 वर्षांपूर्वी स्थापन झालेली बँक ऑफ इंग्लंड अतिशय प्रतिष्ठित मानली जाते. या बँकेचं गव्हर्नरपद लवकरच रिक्त होणार आहे. इंग्लंडसमोर सध्या ब्रेक्झिटमुळे मोठं आर्थिक संकट निर्माण झालं आहे. अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये महत्त्वपूर्ण पदांवर काम केलेले राजन या परिस्थितीतून मार्ग काढू शकतात, अशी चर्चा अर्थ वर्तुळात आहे. सध्या राजन शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक आहेत. राजन यांच्याकडे जागतिक पातळीवरील अनेक संस्थांमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. राजन यांनी 2003 ते 2006 या कालावधीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून काम केलं. त्यावेळी त्यांनी जागतिक मंदीबद्दल भाष्य केलं होतं. त्यानंतर जगभरात मंदी आली. त्यामध्ये अमेरिकेतील लेहमन ब्रदर्ससारख्या अनेक महत्त्वाच्या बँका बुडाल्या. राजन यांचं जागतिक मंदीबद्दलचं भाकीत खरं ठरलं होतं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर त्यांनी भारत सरकारचे आर्थिक सल्लागार म्हणून काम केलं. 2010 ते 2013 या काळात ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. बुडित खात्यात गेलेल्या कर्जांमुळे अडचणीत सापडलेल्या बँकांसमोरील अडचणी कमी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते.  

टॅग्स :Raghuram Rajanरघुराम राजनReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकEnglandइंग्लंड