शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

"शांतपणे प्रायव्हेट प्लेननं निघा अन्...!" पुतिन यांनी असद कुटुंबाला कसं काढलं सीरियाबाहेर? जाणून घ्या संपूर्ण स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 14:18 IST

बंडखोरांचे बंड सुरू असताना संपूर्ण जगाच्या नजरा सीरियाकडे लागल्या होते. मात्र या सर्वांच्या नजरा चुकवत सीरियाचे राष्ट्रपती पत्नी आणि ...

बंडखोरांचे बंड सुरू असताना संपूर्ण जगाच्या नजरा सीरियाकडे लागल्या होते. मात्र या सर्वांच्या नजरा चुकवत सीरियाचे राष्ट्रपती पत्नी आणि मुलांसह गुप्तपणे रशियात पोहोचले. हद्द तर एवढी की, अमेरिकेलाही याची साधी भनकदेखील लागली नाही. यावेळी केवळ बंडखोरांचे लक्ष भरकटवण्यासाठी देशातून पलायन करत असलेल्या असद यांचे विमान कोसळल्याची अफवा पसरवली गेली. या नंतर, असद आणि त्याच्या कुटुंबाचे फोटो समोर आले आणि ते रशियाला पोहोचल्याची पुष्टी झाली. आता या घटनेनंतर असद आपल्या कुटुंबासह एवढ्या शांतपणे सीरियातून रशियाला कसे पोहोचले याची संपूर्ण स्टोरी समोर आली आहे.

रशियामध्ये असद सुरक्षित -सीरियाचे पदच्युत राष्ट्रपती बशर अल-असाद यांच्यासंदर्भात रशियाचे उप परराष्ट्रमंत्री सर्गेई रियाबकोव्ह यांनी एका मुलाखतीत माहिती दिली आहे. बशर अल-असद यांना अत्यंत सुरक्षितपणे रशियात पोहोचवण्यात आले आहे. ते रशियामध्ये असून सुरक्षित आहेत." मात्र, त्याच्यासोबत कोणकोण आहेत? याचा खुलासा झालेला नाही.

पुतिन यांचा मास्टर प्लॅन - पुतिन यांनी असाद यांना सीरियातून बाहेर काढण्यासाठी खास प्लॅन केला होता. त्यांनी असद यांना खाजगी विमानाने बाहेर पडण्यास सांगितले. हे विमान दमास्कस आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभे होते. बंडखोरांनी दमास्कसमध्ये प्रवेश करताच ही कारवाई सुरू करण्यात आली. यासाठी प्रथम असाद आणि त्याच्या कुटुंबियांना अत्यंत कडेकोट सुरक्षेत जीवनावश्यक वस्तूंसह दमास्कस विमानतळावर नेण्यात आले. यावेळी, दमास्कस आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याच्या सुरक्षिततेसाठी डझनावर वाहने उपस्थित होती. सीरियन सैन्यही तेथे होते. यानंतर असद आणि त्यांच्या कुटुंबीयांना विमानात बसवण्यात आले आणि काही मिनिटांतच विमान रशियासाठी रवाना झाले.

विमान क्रॅश झाल्याची अफवा अन्...-यानंतर, असाद यांना घेऊन जाणारे विमान क्रॅश झाल्याची अफवा पसरवण्यात आली. असे केवळ बंडखोरांचे लक्ष भरकटवण्यासाठी करण्यात आले. यानंतर मॉस्कोने 'ट्रान्सपॉन्डर ट्रिक' वापरून असद यांना सीरियाच्या किनारपट्टीवरील हवाई तळातून नेण्याची व्यवस्था केली.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, "असद यांना, विमानाचे टेक ऑफ झाल्यानंतर काही वेळानंतर, त्याचा ट्रान्सपॉन्डर बंद करण्यास सांगण्यात आले. यानंतर विमान सीरियन तटावर रशियाच्या खमीमिम हवाई तळापर्यंत गेले. यासाठी विमानाने मोठा यूटर्नदेखील घेतला होता. यानंतर, खमीमिम एअरबेसवर आधीपासूनच तैनात रशियन सैनिकांच्या विमानाने असद आणि त्याच्या कुटुंबाला मॉस्‍कोमध्ये पाठवण्यात आले.

रशिय एजन्सीने असद यांना पटवलं -माध्यमांनी क्रेमलिनच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या महितीनुसार, बंडखोरांकडून त्याचा पराभव होणार हे स्पष्ट होताच, रशियन सरकारसाठी काम करणाऱ्या एजंटांनी असद यांना ताबडतोब देश सोडण्यासाठी पटवले. याच बरोबर पूर्वनियोजित कारवाईनुसार त्याला देशातून बाहेर काढण्यात आले.

टॅग्स :russiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनSyriaसीरिया