शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

शाळेच्या मधल्या सुट्टीत घरं विकून भारतीय वंशाचा तरुण बनला इंग्लंडमधला कोट्यधीश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 4:55 PM

भारतीय वंशाचा मुलगा इंग्लंडमध्ये सर्वाधिक कोट्यधीश तरुण म्हणून समोर आला आहे. शाळेतील लंच ब्रेकमध्ये हा मुलगा ऑनलाइन इस्टेट एजन्सीद्वारे प्रॉपर्टी विकून कोट्यधीश झाला आहे.

ठळक मुद्दे भारतीय वंशाचा मुलगा इंग्लंडमध्ये सर्वाधिक कोट्यधीश तरुण म्हणून समोर आला आहे.शाळेतील लंच ब्रेकमध्ये हा मुलगा ऑनलाइन इस्टेट एजन्सीद्वारे प्रॉपर्टी विकून कोट्यधीश झाला आहे.19 वर्षांचा अक्षय रुपरेलिया ब-याचदा शाळेच्या वेळेतच फोनवर मालमत्तेच्या व्यवहारासंदर्भात बोली करत असे.

लंडन - भारतीय वंशाचा मुलगा इंग्लंडमध्ये सर्वाधिक कोट्यधीश तरुण म्हणून समोर आला आहे. शाळेतल्या मधल्या सुट्टीत हा मुलगा ऑनलाइन इस्टेट एजन्सीद्वारे प्रॉपर्टी विकून कोट्यधीश झाला आहे. डेली मिररच्या वृत्तानुसार, शाळेच्या मैदानात दुसरी मुलं खेळत असताना हा अवलिया फोनवर डील्स करण्यात व्यस्त असायचा.19 वर्षांचा अक्षय रुपरेलिया ब-याचदा शाळेच्या वेळेतच फोनवर मालमत्तेच्या व्यवहारासंदर्भात बोली करत असे. अक्षयनं एक कॉल सेंटर सर्व्हिससुद्धा विकत घेतली होती. जेणेकरून तो शाळेत असेल तेव्हा कॉल सेंटरच्या माध्यमातून ग्राहकाला त्यांच्या प्रश्नांची सुयोग्य उत्तरे मिळावीत. शाळेतून सुटल्यानंतर अक्षय त्या ग्राहकांशी संपर्क साधायचा. काही महिन्यांमध्येच गुंतवणूकदारांनी अक्षयच्या कंपनीचे समभाग विकत घेणे सुरू केले. एक वर्षात या कंपनीची किंमत 12 लाख पाऊंडपर्यंत पोहोचली.या तरुणानं जवळपास 10 कोटी पाऊंडमध्ये घरं विकून टाकली. आता त्यानं जुन्या इस्टेट एजंटांना या व्यवसायातून हद्दपार करण्याचा चंग बांधला आहे. त्याचं कारणही तसंच आहे. एखादा एजंट घर विकण्यासाठी हजारो पाऊंडचं कमिशन घेतो. परंतु अक्षय हे काम फक्त 99 पाऊंडात करतोय. अक्षयची आयडिया एवढी यशस्वी झाली आहे की, त्याची कंपनी इंग्लंडमधली 18वी सर्वात मोठी इस्टेट एजन्सी कंपनी बनली आहे. विशेष म्हणजे अक्षयनं फक्त 16 महिन्यांपूर्वीच कंपनी सुरू केली होती. अक्षयनं ही कंपनी सुरू करण्यासाठी स्वतःच्या कुटुंबीयांकडून 7 हजार पाऊंड उधारीवर घेतले होते. त्याच्या कंपनीत 12 लोक कार्यरत आहेत. अक्षय आता ती संख्या दुप्पट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. कारण गुंतवणूकदारांनी समभाग खरेदी करण्यासाठी 5 लाख पाऊंड्स दिले आहेत. 

टॅग्स :Englandइंग्लंड