शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भारताला सर्वात जवळचा भागीदार बनवण्याची बायडेन यांची इच्छा, PM मोदींचं केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 00:07 IST

Quad Summit 2022: पीएम मोदी म्हणाले, 'अमेरिकेचे राष्ट्रपती बायडेन यांच्यासोबतची बैठक सार्थक ठरली. आज आम्ही व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, यांसह भारत-अमेरिका संबंधांच्या विविध पैलूंवर व्यापक चर्चा केली.'

भारत आणि अमेरिकेचे संबंध म्हणजे 'विश्वासाची भागीदारी' आहे. आपण, अधिक समृद्ध, मुक्त आणि सुरक्षित जगासाठी राष्ट्रपती ज्यो बायडेन यांच्यासोबत काम करण्यास तयार आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यावेळी या दोन्ही नेत्यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण आणि आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी वचनबद्ध असल्याचेही म्हटले आहे. या बैठकीनंतर, पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत राष्ट्रपती बायडेन यांच्यासोबतची बैठक सार्थक ठरल्याचे म्हटले आहे.

बैठकीसंदर्भात काय म्हणाले पीएम मोदी - पीएम मोदी म्हणाले, 'अमेरिकेचे राष्ट्रपती बायडेन यांच्यासोबतची बैठक सार्थक ठरली. आज आम्ही व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, यांसह भारत-अमेरिका संबंधांच्या विविध पैलूंवर व्यापक चर्चा केली.'

बायडेन यांची मोदींना जवळ करण्याची इच्छा - राष्ट्रपती बायडेन पंतप्रधान मोदींना म्हणाले, "भारतासोबत असलेली अमेरिकेची भागीदारी ही, पृथ्वीवरील सर्वात निकटतम भागीदारी बनविण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. एवढेच नाही, तर दोन्ही देश एकत्रितपणे खूप काही करू शकतात आणि करतीलही. याशिवाय, क्वाड शिखर सम्मेलनाच्या पूर्वसंध्येला बायडेन यांनी 12 हिंद-प्रशांत देशांसोबत एका नव्या व्यापार कराराला सुरुवात केली. याचा हेतू त्या देशांची अर्थव्यवस्था मजबूत करणे असा आहे. 

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट करत सांगितले, की 'भारत-अमेरिकेची जागतिक धोरणात्मक आघाडी' पुढे नेत, पंतप्रधान मोदी आणि बायडेन यांनी द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर व्यापक चर्चा केली. दोन्ही नेत्यांत व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, तसेच भारत -अमेरिका संबंध पुढे नेण्याच्या मार्गांसंदर्भातही चर्चा झाली. एका वरिष्ठ अधिकाऱ्या म्हटल्यानुसार, क्वाड शिखर सम्मेलनाच्या एका सत्रादरम्यान बायडेन यांनी कोरोना महामारीचा लोकशाही पद्धतीने सामना केल्याबद्दल पीएम मोदींचे कौतुक केले. याच बरोबर, महामारीचा सामना करण्यात भारत चीनच्या तुलनेत अधिक यशस्वी ठरल्याचेही म्हटले आहे.  

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJoe Bidenज्यो बायडनIndiaभारतAmericaअमेरिका