मध्य पूर्वेतील युद्धामुळे अनेक देशांवर ऊर्जा संकट येण्याची चिन्हे आहेत. त्यात पाकिस्तान सर्वात पुढे आहे. पाकिस्तानात ऊर्जा संकट उंबरठ्यावर पोहचले आहे. शेजारील राष्ट्रांकडून कच्च्या तेलापासून एलएनजी गॅस पुरवठ्यापर्यंत, केवळ काहीच दिवसांचा साठा शिल्लक आहे. यातच कतारने पाकिस्तानला मोठा इशारा दिला आहे.
कतारने पाकिस्तानला एक नोटीस जारी केली आहे. त्यात पाकिस्तानला होणारा LNG पुरवठा आम्ही बंद करत आहोत असं लिहिलं आहे. पाकिस्तानचे फेडरल एनर्जी मिनिस्टर अली परवेज मलिक यांनी ही माहिती दिली. कतारच्या या निर्णयामुळे पाकिस्तानात ऊर्जा संकट आणखी गंभीर होईल अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. कतारहून एलएनजी पुरवठा आधीच बाधित झाला आहे. कारण इराणने त्यांच्या अनेक प्लांटवर मिसाइल हल्ले केले होते. त्यानंतर कतारने LNG चे उत्पादन आणि पुरवठा रोखण्याचे ठरवले. कतारच्या या निर्णयामुळे पाकिस्तानसारख्या बऱ्याच देशांवर संकट आणखी वाढले. आता कतारने पाकिस्तानला एलएनजी पुरवठा करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
कतारकडून पाकिस्तानला ९९ टक्के LNG पुरवठा
एका आकडेवारीनुसार, कतारने घेतलेल्या निर्णयाचा फटका पाकिस्तानला किती बसू शकतो याचा अंदाज कतार आणि संयुक्त अरब अमीरात मिळून पाकिस्तानला गरजेच्या ९९ टक्के LNG पुरवठा करते यावरून लक्षात येते. तर बांगलादेश ७२ टक्के आणि भारताची ५३ टक्के गरज कतार पूर्ण करते. परंतु भारताकडे अन्यही पर्याय आहेत. पाकिस्तान आणि बांगलादेशकडे इतर पर्याय दिसत नाहीत. त्यामुळे कतारच्या निर्णयानंतर पुढे काय करायचे याचे मोठे आव्हान पाकिस्तानसमोर आहे.
दरम्यान, पाकिस्तानात ऊर्जा पुरवठा कमी झाला तर वीजेची मोठी समस्या उद्भवू शकते. कोळशावर निर्भरता आणखी वाढू शकते. सौरऊर्जेची उपलब्धता वाढल्याने वीज संकट टाळता येऊ शकते असं तज्ज्ञांना वाटते. सोबत कच्च्या तेलाचे संकटही पाकिस्तानात येणार आहे. इथं मर्यादित पेट्रोलियम साठा आणि कच्च्या तेलाचा साठा काहीच दिवस उपलब्ध होऊ शकतो. इराणकडून पूर्णपणे पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे मध्य पूर्वेतील तणावाने पाकिस्तानचे कंबरडे आणखी मोडण्याची शक्यता आहे.
Web Summary : Amidst Middle East tensions, Qatar halts LNG supply to Pakistan, worsening its energy crisis. Pakistan relies heavily on Qatar for LNG. Limited oil reserves and Iran's supply cuts exacerbate the situation, potentially leading to power outages and increased coal dependence.
Web Summary : मध्य पूर्व तनाव के बीच, कतर ने पाकिस्तान को एलएनजी आपूर्ति रोकी, जिससे उसका ऊर्जा संकट गहरा गया। पाकिस्तान एलएनजी के लिए कतर पर बहुत अधिक निर्भर है। सीमित तेल भंडार और ईरान की आपूर्ति में कटौती से स्थिति और खराब हो गई है, जिससे बिजली कटौती और कोयले पर निर्भरता बढ़ सकती है।