शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

Russia-Ukraine War: हस्तक्षेप खपवून घेणार नाही...!; पुतीन यांची युक्रेनला मदत करणाऱ्या देशांवर थेट हल्ल्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 13:54 IST

युक्रेन विरुद्धच्या युद्धात इतर कोणत्याही देशानं हस्तक्षेप केल्यास परिणाम वाईट होतील अशी उघड धमकी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिली आहे.

मॉक्सो-

युक्रेन विरुद्धच्या युद्धात इतर कोणत्याही देशानं हस्तक्षेप केल्यास परिणाम वाईट होतील अशी उघड धमकी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिली आहे. युद्धात हस्तक्षेप करणाऱ्या देशांवर तात्काळ हल्ला करण्याची संपूर्ण तयारी रशियाची आहे, असं रोखठोक विधान पुतीन यांनी केलं आहे. पुतीन यांच्या विधानानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

रशियानं अमेरिकेला युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवठा बंद करण्याचं आवाहन केलं आहे. पश्चिमी देशांकडून युक्रेनला केला जाणारा शस्त्र पुरवठा युद्धाची धग आणखी वाढविण्याचं काम करत आहेत. बुधवारी सेंट पीट्सबर्गमध्ये खासदारांना संबोधित करताना पुतीन यांनी पश्चिमेकडील देशांचा रशियाचे तुकडे करण्याचा मनसुबा असल्याचं म्हटलं. पश्चिमेकडील देशांनी युक्रेनला युद्धाच्या संकटात टाकल्याचा आरोपही पुतीन यांनी यावेळी केला.

पुतीन म्हणाले आम्ही शस्त्रांनी सुसज्ज!युक्रेन विरुद्धच्या आमच्या युद्धात जर कुणीही हस्तक्षेप करत असेल आणि रशियाला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण करु इच्छित असेल तर ते अजिबात खपवून घेतलं जाणार नाही, असं पुतीन म्हणाले. असं करणाऱ्या देशांना प्रत्युत्तर दिलं जाईल आणि त्यासाठी आमच्याकडे सर्व शस्त्र सज्ज आहेत. आम्ही अहंकारी अजिबात नाही पण गरज पडल्यास आम्ही शस्त्रांचा वापरही करू, असंही पुतीन म्हणाले. 

युक्रेन विरोधात रशियानं २४ फेब्रुवारी रोजी युद्ध पुकारलं. दोन महिन्यांनंतर रशियानं युक्रेनच्या काही शहरांवर ताबा मिळवला आहे. तर अनेक शहरं बेचिराख करुन टाकली आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ५० लाखांहून अधिक लोकांनी युक्रेन सोडलं आहे. युक्रेनविरोधातील कारवाईला रशियानं विशेष कारवाई असं म्हटलं आहे. तर युक्रेन आणि पश्चिमेकडील देशांनी यास विनाकारण युद्ध करण्याचं खोटा बहाणा असल्याचं ठरवलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन गुरुवारी रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धासंदर्भात निवेदन जारी करणार आहेत. 

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशिया