शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारची शेतकऱ्यांना भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
2
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
3
MTNL Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
4
सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
5
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या
6
Salman Khan: सलमान खानने विकला आलिशान फ्लॅट, किती कोटींना झाली डील? वाचा सविस्तर
7
चिंताजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीची मानसिक अवस्था बिघडली, रस्त्यावर भयानक अवस्थेत सापडली
8
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!
9
कंबर, मान, खांद्यामध्ये असह्य वेदना; दुर्मिळ आजारामुळे १२ किलोने वाढला स्तनांचा आकार
10
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
11
तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?
12
भारताकडून ब्राह्मोस, जपानकडून युद्धनौका, आता तैवानसोबत मिळून चीनला आव्हान देणार हा देश
13
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
14
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
15
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
16
श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दररोज करता का? शुभ-लाभ होतात, स्वामी कायम सोबत राहतात!
17
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
18
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ पहिल्या क्रमांकावर राज्य करणारे गोलंदाज!
19
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?
20
सूर्य गोचराने शुभ राजयोग: ७ राशींचे कल्याण, भाग्याची साथ; महिनाभर ‘हे’ करा, लाभच लाभ मिळवा!

रशिया-युक्रेन युद्ध केव्हा संपणार? पुतीन समर्थकानं केली अजब भविष्यवाणी, कोण जिंकणार तेही सांगितलं! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 16:17 IST

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही सुरूच आहे. यात पुतीन प्रेमी एका भविष्य सांगणाऱ्या व्यक्तीनं लवकरच युद्ध संपणार असल्याची भविष्यवाणी केली आहे.

मॉक्सो-

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही सुरूच आहे. यात पुतीन प्रेमी एका भविष्य सांगणाऱ्या व्यक्तीनं लवकरच युद्ध संपणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. युक्रेनमध्ये रशियन सैन्य आपली पूर्ण ताकदीचं दर्शन घडवेल आणि लवकरच विजय प्राप्त करेल असं तिनं म्हटलं आहे. एलिसिया आर्टेमयेवा असं भविष्यवाणी करणाऱ्या पुतीन समर्थकाचं नाव आहे. युक्रेन विरुद्धचा संघर्ष सध्या शेवटच्या टप्प्यात असल्याचं तिनं म्हटलं आहे. रशियन सैन्य आता पुढे जाण्यासाठी सज्ज आहे. येत्या तीन आठवड्यात युक्रेनचं समर्थन करणारे पाश्चिमात्य देश खडबडून जागे होतील. रशिया हे युद्ध जिंकणार आहे, असं तिचं म्हणणं आहे.

"युद्ध आता शेवटच्या टप्प्याकडे वळत आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत युक्रेनला कळून चुकेल की ते आता पराभूत झाले आहेत. त्यांच्याकडे रशियन सैन्याविरुद्ध लढण्याचा कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. हळूहळू त्यांची उर्जा आणि जोश कमी होत आहे. तर रशियन सैन्य दिवसेंदिवस आणखी मजबूत होत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीच्या रशियाची सीमा युक्रेनच्या दिशेनं वाढेल", अशी भविष्यवाणी एलिसिया हिनं केली आहे. 

संघर्ष आता मिटण्याच्या दिशेने'युक्रेन आता रशियाचं वर्चस्व नाकारू शकणार नाही', असं एलिसिया म्हणाली. mk.ru च्या अहवालानुसार, एप्रिलच्या मध्यात रशिया युक्रेनच्या अनेक भागांवर कब्जा करण्यास सुरवात करेल. हा संपूर्ण संघर्ष आता तोडगा काढण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं ती म्हणाली. पाश्चिमात्य लोकांना आता हे समजू लागलं आहे की रशियन लोकांच्या वाकड्यात कधी जाऊ नये. हे भाकीत अशा वेळी होत आहे, जेव्हा रशियाचे अध्यक्ष अण्वस्त्रांनी पाश्चात्य देशांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत.

रशियन अण्वस्त्रे बेलारूसमध्ये तैनातबेलारूसमधील रशियाच्या राजदूताने रविवारी सांगितले की त्यांचा देश बेलारूसच्या सीमेवर उत्तर अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (नाटो) च्या सदस्य राष्ट्रांसह अण्वस्त्रे तैनात करेल. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियाच्या शेजारी आणि मित्र राष्ट्रांच्या हद्दीत सामरिक अण्वस्त्रे तैनात करण्याबाबत नुकत्याच केलेल्या वक्तव्यानंतर राजदूत बोरिस ग्रिझलोव्ह यांनी हे वक्तव्य केले आहे. विश्लेषकांच्या मते, ही घोषणा म्हणजे अण्वस्त्रांचा धोका दाखवून पाश्चात्य देशांना युक्रेनला पाठिंबा देण्यापासून परावृत्त करण्याचा आणखी एक प्रयत्न आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्ध