शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

"पुतिन यांनी युक्रेनला 'टेस्टिंग ग्राउंड' बनवलं", रशियन मिसाइल हल्ल्यावरून झेलेन्स्की भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 19:49 IST

दरम्यान, अमेरिकन राष्ट्रपती ज्यो बायडेन यांच्याकडून फ्री हँड दिळाल्यानंतर, युक्रेनने अमेरिकेकडून मिळालेले लांब पल्ल्याचे मिसाइल नुकतेच रशियान भागात डागले होते. आता रशियाने या हल्ल्याचा बदला घेतला आहे.

युक्रेनच्या हवाई हल्ल्यांना रशियानेही मिसाइल हल्ला करत थेट प्रत्युत्तर दिले आहे. रशियाने 21 नोव्हेंबरला पहाटे 5 ते 7 वाजण्याच्य सुमारास युक्रेनच्या Dnipro शहरावर ICBM मिसाइल्सच्या माध्यमाने जबरदस्त हल्ला केला. 

दरम्यान, अमेरिकन राष्ट्रपती ज्यो बायडेन यांच्याकडून फ्री हँड दिळाल्यानंतर, युक्रेनने अमेरिकेकडून मिळालेले लांब पल्ल्याचे मिसाइल नुकतेच रशियान भागात डागले होते. आता रशियाने या हल्ल्याचा बदला घेतला आहे. रशियाने युक्रेनच्या भागांत हल्ला करण्यासाठी RS-26 Rubezh मिसाइल्सचा वापर केला आहे. जी अस्त्राखान भागातून डागण्यात आली होती.

'रशियाने तो घाबरला असल्याचे दाखवून दिले' -आता या हल्ल्यावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची प्रतिक्रिया आली आहे. झेलेन्स्की म्हणाले, "रशिया युक्रेनचा वापर 'टेस्टिंग ग्राउंड' म्हणून करत आहे. 21 नोव्हेंबर रोजी युक्रेन सन्मान आणि स्वातंत्र्य दिन साजरा करतो. युक्रेनच्या दोन क्रांतीची आठवण ठेवण्याचा आणि जनतेचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. मात्र, यातच आपला शेजारी पुन्हा एकदा त्याची खरी ओळख दाखवत आहे. या हल्ल्यातून रशियाने तो किती घाबरला आहे, हे दाखवून दिले आहे."

या मिसाइल्सने करण्यात आला हल्ला -महत्वाचे म्हणजे, या युद्धात प्रथमच आंतरखंडीय क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला. यासाठी रशियाने आरएस-26 रुबेझ क्षेपणास्त्रे वापरली असण्याची शक्यता आहे, जी अस्त्रखान भागातून डागण्यात आली. युक्रेनच्या हवाई दलाने या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. 

या मिसाइलशिवाय, किंझल हायपरसोनिक आणि KH-101 क्रूझ क्षेपणास्त्रांनीही हल्ला करण्यात आला. तसेच, युक्रेनियन हवाई दलाने पुष्टी केली आहे की, या हल्ल्यात युक्रेनच्या महत्त्वाच्या संस्था, इमारतींचे नुकसान झाले आहे. या हल्ल्यात रशियाने क्रूझ मिसाइल्स डागण्यासाठी आपल्या लांब पल्ल्याच्या बॉम्बर Tu-95MS चा वापर केला आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन