शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

क्रेमलिनवर ड्रोन हल्ला; व्लादिमीर पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न, रशियाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 19:09 IST

रशियाचे म्हणणे आहे की, युक्रेनने पुतिन यांना मारण्यासाठी क्रेमलिनवर ड्रोनने हल्ला केला. मात्र या हल्ल्यात पुतिन यांना कोणतीही इजा झालेली नाही.

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले 'महायुद्ध' थांबण्याचे नाव घेत नाही आहे. दरम्यान, रशियाने युक्रेनवर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. रशियाचे म्हणणे आहे की, युक्रेनने पुतिन यांना मारण्यासाठी क्रेमलिनवर ड्रोनने हल्ला केला. मात्र या हल्ल्यात पुतिन यांना कोणतीही इजा झालेली नाही. ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. 

रशियाने बुधवारी एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, पुतिन यांची हत्या करण्यासाठी काल रात्री क्रेमलिनवर दोन ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा हे ड्रोन रशियाने हाणून पाडले. दरम्यान, रशियाने या हल्ल्याला दहशतवादी हल्ला म्हटले आहे.

तसेच, क्रेमलिनचे म्हणणे आहे की, 9 मे रोजी होणाऱ्या विजय दिनाच्या परेडपूर्वी हा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पुतिन यांच्यावर ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मात्र यामध्ये पुतिन यांना कोणतीही इजा झालेली नाही. आम्हाला बदला घेण्याचा अधिकार आहे. ड्रोन हल्ल्यानंतरही 9 मे रोजी होणारी विजय दिन परेड वेळेवर होणार आहे.

हल्ल्यानंतर पुतिन बंकरमधून काम करतीलक्रेमलिन मीडियानुसार, या हल्ल्यानंतर पुतिन नोवो-ओगारेवो येथील त्यांच्या निवासस्थानी बांधलेल्या बंकरमधून काम करतील. रशिया युक्रेनच्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. या ड्रोन हल्ल्यानंतरही रशियात 9 मे रोजी होणारी परेड पुढे ढकलली जाणार नाही. त्याच वेळी, मॉस्कोच्या महापौरांनी ड्रोनच्या उड्डाणावर बंदी घातली आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष काय म्हणाले?युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेंस्की यांनी क्रेमलिनवर झालेल्या ड्रोन हल्ल्यासंदर्भात एक स्टेटमेंट जारी केले आहे. युक्रेनचा याच्याशी काही संबंध नसल्याचे म्हटले आहे. युक्रेन लवकरच रशियावर मोठा हल्ला करेल, हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :russiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन