शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

शरीरात चिप बसवा अन् दारूचे व्यसन कायमचे सोडवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 12:38 IST

चीनची अनोखी उपाययोजना; प्रयोगांत दिसले चांगले परिणाम

बीजिंग : दारूचे व्यसन सोडविण्यासाठी चीनमध्ये एक अनोखी उपाययोजना करण्यात आली आहे. एका दारुड्या माणसाच्या शरीरात पाच मिनिटांच्या शस्त्रक्रियेद्वारे चिप बसविण्यात आली. दारूचे व्यसन रोखण्यासाठी उपयोगात आणला जाणारा नाल्ट्रेस्कॉन हा घटक त्या चिपच्या माध्यमातून शरीरात सोडण्यात येतो व त्याद्वारे मेंदूतील रिसेप्टरना लक्ष्य करण्यात येते. त्यामुळे एखाद्याच्या मनात दारू पिण्याची निर्माण झालेली इच्छा नाल्ट्रेस्कॉनच्या परिणामामुळे नाहीशी होते व माणूस  व्यसनापासून दूर राहतो.

चीनमध्ये दारूचे व्यसन सोडविण्यासाठी लियू या ३६ वर्षीय व्यक्तीच्या शरीरात शस्त्रक्रियेद्वारे चिप बसविण्यात आली आहे. अशा प्रकारची शस्त्रक्रिया झालेला तो त्या देशातील पहिला व्यक्ती ठरला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डाचे उपाध्यक्ष हाओ वेई यांच्या देखरेखीखाली हुनान ब्रेन हॉस्पिटलमध्ये १२ एप्रिलला पाच मिनिटांत ही शस्त्रक्रिया पार पडली. दारूचे व्यसन सोडविण्यासाठी चिपचा करण्यात येणारा वापर हा  क्लिनिकल चाचण्यांचा एक भाग आहे. (वृत्तसंस्था)

या प्रयोगांतून असे आढळले की, दारू पिण्याची सतत होणारी इच्छा हळूहळू कमी झाली. आता  दारूचे व्यसन पूर्णपणे सुटेल असा त्याला विश्वास वाटत आहे. जगात दारूमुळे सर्वाधिक मृत्यू चीनमध्ये होतात असे दी लॅन्सेट मेडिकल जर्नलमध्ये २०१८ साली प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तात म्हटले आहे. 

नेमके काय केले?हुनान प्रांतातील रहिवासी असलेला लियू याला गेल्या १५ वर्षांपासून दारूचे व्यसन जडले आहे. तो दररोज किमान अर्धा लिटर दारू पित असे. त्यानंतर तो हिंसक व्हायचा. तो कामाच्या ठिकाणी तसेच रात्रीदेखील दारू प्यायचा. त्याची ही वाईट सवय सोडविण्यासाठी कुटुंबीयांनी खूप प्रयत्न केले; पण त्यांना

काही यश येत नव्हते. त्याच्या व्यसनामुळे घरच्या मंडळींना खूप मनस्ताप सोसावा लागत होता. मात्र, त्याचे व्यसन एका चिपच्या माध्यमातून सोडविता येईल अशी आशा निर्माण झाली. त्यासंदर्भातील प्रयोगांच्या चाचणीमध्ये सहभागी होण्यास लियू तयार झाला. त्यानंतर शस्त्रक्रियेद्वारे त्याच्या शरीरात एक विशिष्ट चिप बसविण्यात आली.

टॅग्स :liquor banदारूबंदीchinaचीन