शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अंतराळवीरांच्या लघवी, घामातून मिळवले शुद्ध पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 07:06 IST

Astronauts: आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर (आयएसएस) असलेल्या अंतराळवीरांनी घाम आणि लघवीचा पुनर्वापर करून ९८ टक्के पिण्यायोग्य पाण्यात रूपांतरित करण्यात यश मिळवले आहे. पर्यावरण नियंत्रण आणि जीवन समर्थन प्रणालीमुळे (ईसीएलएसएस) हे शक्य झाले आहे.

वॉशिंग्टन :  आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर (आयएसएस) असलेल्या अंतराळवीरांनी घाम आणि लघवीचा पुनर्वापर करून ९८ टक्के पिण्यायोग्य पाण्यात रूपांतरित करण्यात यश मिळवले आहे. पर्यावरण नियंत्रण आणि जीवन समर्थन प्रणालीमुळे (ईसीएलएसएस) हे शक्य झाले आहे. हे पुनर्वापर केलेले पाणी छोट्या आणि मोठ्या अंतराळ मोहिमांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. कारण यामुळे त्यांची पाण्याची गरज तेथेच पूर्ण होऊ शकेल.

अंतराळ केंद्रात प्रत्येक अंतराळवीराला पिणे, खाणे आणि दात घासण्यासाठी दररोज सुमारे ३.७८ लिटर (सुमारे एक गॅलन) स्वच्छ पाणी लागते. अंतराळात दीर्घकाळ राहण्यासाठी आणि भविष्यातील मोठी मोहिमा पूर्ण करण्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट पाणी आहे. अंतराळ केंद्रातील शास्त्रज्ञांनी एका पद्धतीने ९८ टक्के पाणी पुन्हा मिळवले आहे. याकडे मोठे उपलब्धी म्हणून पाहिले जात आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने याबाबत माहिती दिली.

अंतराळवीरांनी ईसीएलएसएसचा भाग असलेल्या प्रणालींचा वापर केला. ईसीएलएसएस म्हणजे पर्यावरण नियंत्रण आणि जीवनरक्षक प्रणाली, ज्याचे उद्दिष्ट अंतराळात पुढील वापरासाठी अन्न, हवा आणि पाणी यासारख्या गोष्टींचा पुनर्वापर करणे आहे.

 लघवीत आढळले  ९८ टक्के शुद्ध पाणी  या प्रक्रियेचे उप-उत्पादन म्हणून ब्राइन तयार केले जाते, ज्यामधून सांडपाणी काढून टाकण्यासाठी ब्राइन प्रोसेसर असेम्बली (बीपीए) यूपीएमध्ये जोडली जाते. - जॉन्सन अंतराळ केंद्रातील पथकाचा एक भाग असलेल्या क्रिस्टोफर ब्राऊन यांनी सांगितले की, बीपीएने मूत्रातून स्वच्छ पाण्याचे प्रमाण ९४ टक्क्यांवरून ९८ टक्क्यांपर्यंत वाढवले, जे आतापर्यंतचे सर्वाधिक आहे. पिण्यायोग्य पाणी पुन्हा मिळवण्याची ही पद्धत मंगळासारख्या लांब अंतराळ मोहिमांमध्ये मदत करू शकते.

श्वास आणि घामाच्या आर्द्रतेतून मिळवतात पाणीईसीएलएसएस बनवणाऱ्या हार्डवेअरमध्ये पाणी पुन्हा मिळवण्याची प्रणाली समाविष्ट असते जी सांडपाणी गोळा करते आणि ते पिण्यायोग्य पाणी तयार करणाऱ्या वॉटर प्रोसेसर असेम्बलीकडे पाठवते. अंतराळवीरांचा श्वासोच्छ्वास आणि घामाद्वारे हवेत येणारा ओलावा एकत्र करण्यासाठी डिह्युमिडिफायर वापरला जातो. तर, युरिन प्रोसेसर असेम्बली मूत्रातून पाणी काढून टाकण्यासाठी व्हॅक्यूम डिस्टिलेशन वापरते.

टॅग्स :scienceविज्ञानInternationalआंतरराष्ट्रीय