शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 14:54 IST

पाकिस्तानात आंदोलकांचा आवाज दडपण्यासाठी हिंसेचा आधार घेतला जात आहे. प्रशासनाने अतिरिक्त कुमक मागवली आहे.

मुझफ्फराबाद - पाकव्याप्त काश्मीरमध्ये जनता पाकिस्तानी सरकारच्या अत्याचाराविरोधात एकवटली आहे. मोठ्या प्रमाणात लोकांचा रोष उफाळून आल्यानंतर POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी याठिकाणी मोठ्या संख्येने काश्मीरी पाकिस्तानी अत्याचाराविरोधात रस्त्यावर उतरले. लोकांच्या विरोधाला नियंत्रणात ठेवण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी ताकदीचा वापर केला. पाकिस्तानी सुरक्षा जवानांनी आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केल्याचेही समोर आले आहे.

पाकिस्तान सरकारने केलेल्या करवाढीविरोधात लोकांनी ११ मे रोजी आंदोलनाची हाक दिली होती. त्यासाठी नियोजन करण्यात येत होते. तत्पूर्वी पाकिस्तान सरकारने अतिरिक्त सुरक्षा दल बोलावून लोकांना ताब्यात घेणे सुरू केले. त्यामुळे लोकांमध्ये रोष वाढला. कुठल्याही अटक वॉरंटशिवाय पाकिस्तानात मीरपूर जिल्ह्यातील ७० लोकांना अटक केली. त्यानंतर संतापलेल्या जमावाने सुरक्षा दलांवर दगडफेक सुरू केली. काही ठिकाणी सुरक्षा जवान आणि आंदोलक यांच्यात झटापट झाली. एनआयए रिपोर्टनुसार या भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

पाकिस्तानात आंदोलकांचा आवाज दडपण्यासाठी हिंसेचा आधार घेतला जात आहे. प्रशासनाने अतिरिक्त कुमक मागवली आहे. ज्यात पाकिस्तानी रेंजर्स आणि फ्रंटियर कोअरच्या जवानांचा समावेश आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉननुसार, काश्मीरात ज्वाइंट अवामी एक्शन कमिटीने लॉन्ग मार्चची घोषणा केली होती. हा मोर्चा रोखण्यासाठी ७० जणांना ताब्यात घेण्यात आले. पाकिस्तानी मुलांनाही सोडलं नाही. हवेत धुरांच्या नळकांड्या सोडल्याने अनेकजण जखमी झाल्याचं पुढे आले. 

पाकिस्तानात अनेक ठिकाणी सुरक्षा यंत्रणेविरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. याठिकाणी एक किलो दळण ८००  पाकिस्तानी रुपये झाले आहे. महागाईने लोक त्रस्त आहेत. त्यात करवाढीमुळे अनेक मालाच्या किंमती वाढल्या. त्यामुळे लोकांचा राग वाढला. पीओकेमधील सर्वात मोठा पक्ष यूनाइटेड काश्मीर पीपुल्स नॅशनल पार्टीने अटक केलेल्या लोकांवरून प्रश्नचिन्ह उभे केलेत. पोलीस आणि लष्कर मिळून लोकांवर लाठीचार्ज करतंय. या घटनांची दखल संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार संघटनेने घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPOK - pak occupied kashmirपीओके