शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

म्यानमारमध्ये भीषण रक्तपातानंतरही निदर्शने चालूच, पोलिसांच्या कारवाईत शनिवारी ११४ जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 04:41 IST

Protests continue in Myanmar : निदर्शकांविरुद्ध सुरक्षा दल आणि पोलिसांनी शनिवारी केलेल्या कारवाईत ११४ लोक ठार झाले. लष्करी बंडानंतर शनिवारी भीषण रक्तपात घडला.

यांगून :  लोकशाही प्रस्थापित करण्याच्या मागणीसाठी म्यानमारमध्ये रविवारीही मोठ्या संख्येने निदर्शक रस्त्यावर उतरले. यांगून आणि मंडाले या दोन मोठ्या शहरांसह अन्य ठिकाणीही निदर्शने करण्यात आली. काही ठिकाणी निदर्शक आणि पोलिसांत झटापट झाली. म्यानमारमध्ये गेल्या महिन्यात करण्यात आलेल्या लष्करी बंडाविरोधात म्यानमारमध्ये लोक आंदोलन करीत आहेत. (Protests continue in Myanmar after heavy bloodshed, 114 killed in police action on Saturday)

निदर्शकांविरुद्ध सुरक्षा दल आणि पोलिसांनी शनिवारी केलेल्या कारवाईत ११४ लोक ठार झाले. लष्करी बंडानंतर शनिवारी भीषण रक्तपात घडला.‘म्यानमार नाऊ’च्या वृत्तानुसार शनिवारी लष्कर आणि पोलिसांच्या कारवाईत मृत पावलेल्यांत १६ वर्षांखालील अनेक बालकांचा समावेश आहे. म्यान्मारमधील अन्य माध्यमांनी शनिवारी ११४ जण ठार झाल्याचे म्हटले आहे.

१ फेब्रुवारी रोजी लष्कराने बंड करून ऑँग सॅन स्यू की यांचे निर्वाचित सरकार उखडून टाकल्यानंतर म्यानमारमध्ये निदर्शने चालू आहेत. १४ मार्च रोजी सुरक्षा दल आणि पोलीस कारवाईत ९० निदर्शक ठार झाले होते. त्यानंतर शनिवारी सुरक्षा दल आणि पोलिसांनी घडवलेला मोठा रक्तपात आहे. लष्करी बंंडानंतर आतापर्यंत म्यान्मारमध्ये ४२० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे.

पाच दशकांच्या लष्करी राजवटीनंतर लोकशाहीच्या दिशेने झालेल्या प्रगतीवर लष्करी बंडाचा विपरीत परिणाम झाला आहे. म्यानमार लष्कराच्या या कारवाईची आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक निंदा होत आहे.   

सामान्य जनतेच्या हत्येने सुन्न -गुटारेससंयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस ॲन्टोनियो गुटारेस म्हणाले की, बालकांसह सामान्य जनतेच्या हत्येने सुन्न आहे. लष्करी कारवाई अमान्य आहे. याविरुद्ध एकजूट होऊन कठोर आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया देण्याची गरज आहे. बारा देशंच्या लष्करप्रमुखांनीही संयुक्त निवेदन जारी करून म्यान्मारच्या सशस्त्र दलाला हिंसा थांबविण्याचे आणि जनतेचे संरक्षण करण्याचे आवाहन केले, तसेच म्यान्मारच्या लष्कराने जनतेतील सन्मान आणि विश्वसनीयता पुन्हा कायम करण्यासाठी काम करावे. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, इटली, जर्मनी, डेन्मार्क, ब्रिटन, अमेरिका, युनान, हॉलँड, न्यूझीलँडच्या लष्करप्रमुखांनी हे संयुक्त निवदेन जारी केले आहे.

टॅग्स :Myanmarम्यानमारInternationalआंतरराष्ट्रीय