शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

प्रीती पटेल यांची कॅबिनेटमधून गच्छंती होणार? इस्रायली नेत्यांशी घेतलेल्या गुप्त बैठका भोवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 16:09 IST

इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी त्यांच्या कॅबिनेटमधील मंत्री प्रीती पटेल यांना निलंबित करण्याची तयारी सुरु केली आहे. प्रीती पटेल या सध्या आफ्रिका दौऱ्यावर असून त्यांना तात्काळ माघारी येण्याचे आदेश पंतप्रधान मे यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देपंतप्रधान थेरेसा मे यांच्यावर या दुसऱ्या कार्यकाळामध्ये सुरुवातीपासूनच आरोप आणि टिकेचा भडिमार होत आहे. त्यांच्या सरकारने ब्रेक्झिट बाबत घेतलेली संदिग्ध भूमिका नेहमीच वादात राहिली आहे.प्रीती पटेल या मूळच्या भारतीय वंशाच्या असून त्यांचा जन्म 29 मार्च 1972 साली इंग्लंडमध्ये झाला

लंडन- इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी त्यांच्या कॅबिनेटमधील मंत्री प्रीती पटेल यांना निलंबित करण्याची तयारी सुरु केली आहे. प्रीती पटेल या सध्या आफ्रिका दौऱ्यावर असून त्यांना तात्काळ माघारी येण्याचे आदेश पंतप्रधान मे यांनी दिले आहेत. इस्रायली नेत्यांशी आणि अधिकाऱ्यांशी बैठका घेतल्याचे त्यांनी मान्य केल्यानंतर या घडामोडी लंडनमध्ये घडत आहेत.प्रीती पटेल यांनी ऑगस्ट महिन्यातील इस्रायलमध्ये झालेल्या बैठकांनंतर पुन्हा 7 सप्टेंबर रोजी इस्रायलचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री गिलाड एर्डेन यांची लंडनमध्ये तर परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी युवल रोटेम यांची न्यू यॉर्कमध्ये भेट घेतली असे सांगण्यात येते. इस्रायलच्या बैठकांमध्ये कोणतेही ब्रिटिश अधिकारी उपस्थित नव्हते किंवा पटेल यांनी या बैठकांची योग्य नियमांनुसार कोणतीही माहिती परराष्ट्र मंत्रालयाला दिली नव्हती. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्यासह अनेक इस्रायली नेते, अधिकाऱ्यांशी झालेल्या 12 हून अधिक बैठकांबाबत पटेल यांनी योग्य स्पष्टीकरण न दिल्याबद्दल त्यांना आता आपले पद गमवावे लागणार असे मत इंग्लंडमध्ये विविध माध्यमे व्यक्त करत आहेत. पटेल यांच्या निमित्ताने इंग्लंडमधील विरोधी पक्षांना थेरेसा मे यांच्यावर टीका करण्याची संधी मिळाली आहे. पटेल यांच्या वक्तव्यांमध्ये विसंगती अाहे. त्यांनी इस्रायली नेत्यांच्या बैठका घेऊन इस्रायलला गोलन हाईटसमध्ये आर्थिक मदत देण्यासाठी बोलणी केली असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

पंतप्रधान थेरेसा मे यांच्यावर या दुसऱ्या कार्यकाळामध्ये सुरुवातीपासूनच आरोप आणि टिकेचा भडिमार होत आहे. त्यांच्या सरकारने ब्रेक्झिट बाबत घेतलेली संदिग्ध भूमिका नेहमीच वादात राहिली आहे. त्यातच डिफेन्स सेक्रेटरी मायकल फॉलन यांना लैगिंक अत्याचाराच्या आरोपांमुळे राजीनामा द्यावा लागला आहे. मायकल यांनी 2 नोव्हेंबर रोजी पद सोडले आता पटेल यांनाही पदावरुन बाजूला करण्यात आले तर एका आठवड्याच्या काळात थेरेसा मे यांना दोन मंत्र्यांना गमवावे लागेल. प्रीती पटेल या मूळच्या भारतीय वंशाच्या असून त्यांचा जन्म 29 मार्च 1972 साली इंग्लंडमध्ये झाला. त्यांचे आई-वडिल युगांडामधून आशियाई नागरिकांना हाकलण्याच्या इदी अमिन दादाच्या मोहिमेच्या थोडे आधीच इंग्लंडमध्ये येऊन स्थायिक झाले. पटेल यांना सर्वात प्रथम डेव्हिड कॅमेरुन यांनी कॅबिनेटमध्ये संधी दिली तर थेरेसा मे यांनीही त्यांचे मंत्रिमंडळातील स्थान कायम ठेवले.

टॅग्स :Englandइंग्लंड