शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
16
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
17
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
18
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
19
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
20
देश सर्वप्रथम!- नि:स्पृह राष्ट्रसाधनेची १०० वर्षे!

राजकन्येने नाकारला आठ कोटींचा नजराणा; राजकन्या सामान्य व्यक्तीशी करणार विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 08:52 IST

जपानचे युवराज अखिशिनो यांची मुलगी असलेल्या माको व केई कोमुरो यांचे प्रेमसंबंध व होऊ घातलेल्या विवाहावरून जपानी जनतेने संमिश्र मते व्यक्त केली होती.  

टोकियो : जपानची राजकन्या माको ही राजघराण्यातील नसलेल्या केई कोमुरो या प्रियकराबरोबर लवकरच विवाह करणार असून, त्यानंतर ती अमेरिकेत राहाणार आहे.  राजघराणेबाह्य व्यक्तीबरोबर विवाह करणाऱ्या राजकन्या माको हिला देण्यात येणारा आठ कोटी रुपयांचा नजराणाही तिने नाकारला आहे.

जपानचे युवराज अखिशिनो यांची मुलगी असलेल्या माको व केई कोमुरो यांचे प्रेमसंबंध व होऊ घातलेल्या विवाहावरून जपानी जनतेने संमिश्र मते व्यक्त केली होती.  राजघराणेबाह्य व्यक्तीशी विवाह केल्यानंतर माकोला तिचे राजघराण्याशी निगडित सर्व अधिकारांवर पाणी सोडावे लागेल.

हॅरी व मेगन मर्केलबरोबर तुलना नको

ब्रिटनचा राजपुत्र हॅरी याने राजघराण्यातील नसलेल्या मेगन मर्केल या युवतीबरोबर विवाह केला होता. त्यांच्याशी आमची तुलना कुणीही करू नये, असे जपानची राजकन्या माको हिने म्हटले आहे. जपानमधील अनेक लोकांना माको हिने राजघराण्याबाहेरील व्यक्तीशी विवाह करणे पसंत पडलेले नाही, असे वृत्तपत्रे व समाजमाध्यमांवरील प्रतिक्रियांवरून दिसून येते.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJapanजपान