ठरलं तर! एका स्टार्ट अपमध्ये नोकरी करणार प्रिन्स हॅरी, जाणून घ्या काय करणार काम?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 10:43 AM2021-03-26T10:43:03+5:302021-03-26T10:50:00+5:30

ब्रिटीश राजघराण्यापासून वेगळे झाल्यानंतर प्रिन्स हॅरी आणि पत्नी मेगन मार्केल कॅलिफोर्नियात राहू लागले होते. सोबतच ते कमाईच्या क्षेत्रातही सक्रिय दिसून येत होते.

Prince Harry will do the job as chief impact officer in start up | ठरलं तर! एका स्टार्ट अपमध्ये नोकरी करणार प्रिन्स हॅरी, जाणून घ्या काय करणार काम?

ठरलं तर! एका स्टार्ट अपमध्ये नोकरी करणार प्रिन्स हॅरी, जाणून घ्या काय करणार काम?

Next

ब्रिटनच्या शाही घराण्यातील प्रिन्स हॅरीने राजघराणं सोडल्यानंतर आता नोकरी करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारपासून तो सॅन फ्रान्सिस्को येथील स्टार्टअप बेटरअपसोबत चीफ इम्पॅक्ट ऑफिसर म्हणून काम करणार आहे. मात्र, त्यांच्या या नोकरीसंबंधी आर्थिक माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. ही कंपनी कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी काम करते.

काय करते ही कंपनी?

कंपनीचे सीईओ एलेक्सी रॉबिचॉक्स म्हणाले की, प्रिन्स हॅरी कंपनीसाठी अगदी योग्य आहेत. ते म्हणाले की, त्यांची प्रोत्साहित करण्याची आणि कामाच्या माध्यमातून प्रभाव सोडण्याची पद्धत चांगली आहे. बेटरअप कंपनी अनेक मोठ्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत मानसिक आरोग्य आणि कोचिंगच्या क्षेत्रात काम करते. 

ब्रिटीश राजघराण्यापासून वेगळे झाल्यानंतर प्रिन्स हॅरी आणि पत्नी मेगन मार्केल कॅलिफोर्नियात राहू लागले होते. सोबतच ते कमाईच्या क्षेत्रातही सक्रिय दिसून येत होते. त्यांनी नेटफ्लिक्ससोबत कंटेट तयार करणे आणि स्पॉटिफायसोबत पॉडकास्ट तयार करण्यासंबंधी डीलही साइन केली. बेटरअप कंपनीसोबत काम करण्यासंबंधी माहिती हॅरीने ब्लॉगमध्ये दिली आहे.

हॅरीने सांगितले की, बेटरअप कंपनीसोबत याकारणाने काम करतोय कारण तो कंपनीच्या मानसिक आरोग्याच्या मिशनवर विश्वास ठेवतात. बेटरअपची सुरूवात २०१३ मध्ये झाली होती. आता कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढून २७० झाली आहे. सोबतच २ हजार कोचचं नेटवर्कही कंपनीने तयार केलंय. कंपनीच्या क्लाइंट्समध्ये नासा, शेवरॉन, मार्क, स्नॅप आणि वॉर्नर मीडियासारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

वर्क फ्रॉम होम करणार

द सनने दिलेल्या वृत्तानुसार, प्रिन्स हॅरी आपल्या कॅलिफोर्नियातील घरातूनच काम करणार आहे. तो इथे पत्नी आणि मुलासोबत १४५०० स्क्वेअर फुटा्या आलिशान घरात राहतो. मीडिया रिपोर्टनुसार, या घरात ९ खोल्या आहेत. तर १६ बाथरूम आहेत. इथे स्वीमिंग पूल, प्ले ग्राउंड आणि टेनिस कोर्टही आहे.
 

Web Title: Prince Harry will do the job as chief impact officer in start up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.