शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कुवेतमधील सर्वोच्‍च नागरी पुरस्‍काराने सन्‍मान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 17:09 IST

कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबा यांच्याकडून नरेंद्र मोदी यांना रविवारी 'द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्‍यात आला. 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर आहेत. चार दशकांतील भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच कुवेत भेट आहे. यादरम्यान, कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबा यांच्याकडून नरेंद्र मोदी यांना रविवारी 'द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्‍यात आला. 

कुवेतमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'गार्ड ऑफ ऑनर'देत भव्य स्वागत केले. कुवेतमधील 'बायन' पॅलेसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी, कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबाही उपस्थित होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबा यांच्याशी विस्तृत चर्चा केली. यावेळी चर्चेत भारत-कुवेत संबंधांना नवीन गती देण्यावर भर देण्यात आला आहे. विशेषत: व्यापार, गुंतवणूक आणि ऊर्जा क्षेत्रात परस्पर गुंतवणूक आणि व्यापारावर चर्चा झाली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि.२१) कुवेतमधील गल्फ स्पीक लेबर कॅम्पला भेट देऊन भारतीय कामगारांशी संवाद साधला. मोदी म्हणाले की, "भारतात सर्वात स्वस्त डेटा (इंटरनेट) आहे आणि जर आपल्याला जगभरात किंवा भारतात कुठेही ऑनलाइन बोलायचे असेल तर त्याची किंमत खूपच कमी आहे. तुम्ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंग केले तरी खर्च खूपच कमी आहे. लोकांची मोठी सोय आहे, ते दररोज संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी बोलू शकतात.

भारत, कुवेतमध्ये शतकानुशतके जुने संबंधभारत आणि कुवेतमध्ये शतकानुशतके जुने संबंध आहेत, सागरी व्यापार त्यांच्या ऐतिहासिक संबंधांचा कणा आहे. कुवेतला भारतीय निर्यात आता २ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे आणि भारतातील कुवेत गुंतवणूक प्राधिकरणाची गुंतवणूक १० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. कुवेत हा भारताचा एक महत्त्वाचा ऊर्जा भागीदार आहे, जो भारताच्या कच्च्या तेलाच्या गरजांपैकी ३ टक्के गरजा पूर्ण करतो.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीInternationalआंतरराष्ट्रीय