शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

प्राइम मिनिस्टर मोदी इज द बॉस! ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांचे गौरवोद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 06:18 IST

सिडनी : प्राइम मिनिस्टर मोदी इज द बॉस, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र  मोदी ...

सिडनी : प्राइम मिनिस्टर मोदी इज द बॉस, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांची जोरदार स्तुती केली. देशातील सर्वांत मोठ्या इनडोअर स्टेडियमपैकी एक असलेल्या कुडोस बँक एरिना येथे आयोजित भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचे ऑस्ट्रेलियातील हजारो भारतीयांनी जोरदार स्वागत केले. अल्बानीज यांनी मोदी यांची स्तुती करताच उपस्थित भारतीयांना टाळ्यांचा एकच कडकडाट केला. 

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, परस्पर विश्वास आणि आदर हा भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांचा सर्वांत मजबूत आणि सर्वांत मोठा पाया आहे. नरेंद्र मोदी यांनी ब्रिस्बेनमध्ये भारतीय वाणिज्य दूतावास सुरू करण्याची घोषणाही या कार्यक्रमात केली. या कार्यक्रमाला ऑस्ट्रेलियाच्या विविध भागांतून आलेले २१,००० हून अधिक लोक उपस्थित होते.

भारतात क्षमता आणि टॅलेंटn आयएमएफ भारताला जागतिक अर्थव्यवस्थेचे उज्ज्वल स्थान मानते हे अधोरेखित करून मोदी म्हणाले, जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, जर असा कोणताही देश असेल जो जागतिक संकटांना तोंड देत असेल, तर तो भारत आहे. n अत्यंत आव्हानात्मक काळातही भारताने विक्रमी निर्यात केली आहे. भारताकडे क्षमतेची कमतरता नाही, भारताकडे संसाधनांचीही कमतरता नाही, आज ज्या देशात जगातील सर्वांत मोठी आणि सर्वांत तरुण टॅलेंट फॅक्टरी आहे, तो देश म्हणजे भारत आहे.

नगराला नाव ‘लिटिल इंडिया’या कार्यक्रमाला संपूर्ण देशातून भारतीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांचे आमगन होताच लोकांनी ‘मोदी-मोदी’ अशा जोरदार घोषणाही दिल्या. मोदी यांनी येथील एका उपनगराचे नाव ‘लिटिल इंडिया’ असे ठेवले. 

पंतप्रधान मोदी जिथे जातील तिथे त्यांचे रॉकस्टारसारखे स्वागत होते. अमेरिकन रॉकस्टार ब्रूस स्प्रिंगस्टीन यांचा याच ठिकाणी २०१७ मध्ये कार्यक्रम झाला होता. त्यांचेही इतके भव्य स्वागत झाले नव्हते. स्प्रिंगस्टीन यांना त्यांचे फॅन बॉस म्हणून संबोधतात.     - अँथनी अल्बानीज, पंतप्रधान, ऑस्ट्रेलिया

दोन्ही देशांचे संबंध दृढ करण्यासाठी भारतीय समुदायाने महत्त्वाची भूमिका बजावली. दोन्ही देशांमधील विमानांची संख्या वाढली असून, भविष्यात विमानांची संख्या आणखी वाढेल. परस्पर विश्वास व आदर हा या संबंधांचा सर्वांत मजबूत आणि सर्वांत मोठा पाया आहे.     - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAustraliaआॅस्ट्रेलिया