शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

30 सप्टेंबरपासून पाकिस्तानात प्राथमिक शाळा सुरू होणार, मुलांसाठी विशेष तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 17:17 IST

पहिल्या टप्प्यात महाविद्यालय, विद्यापीठासह 9 वी ते 12वी पर्यंतच्या शाळा 15 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आल्या. यानंतर 23 सप्टेंबरपासून 8 वी, 7 वी आणि 6वी इयत्तेच्या शाळा सुरू करण्यात आल्या.

पाकिस्तानमध्ये मोठ्या शाळा व महाविद्यालय सुरू झाल्याच्या 15 दिवसांनंतर 30 सप्टेंबरपासून लहान मुलांसाठीच्या प्राथमिक शाळा सुरू केल्या जात आहेत. प्राथमिक शाळांसाठी नियम कडक करण्यासाठी पाकिस्तान सरकारने कठोर पावले उचलली आहेत. प्राथमिक शाळांमधील मुलांसाठी ही विशेष अंमलबजावणी केली जाईल. पाकिस्तानने देशातील शैक्षणिक संस्था तीन टप्प्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात महाविद्यालय, विद्यापीठासह 9 वी ते 12वी पर्यंतच्या शाळा 15 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आल्या. यानंतर 23 सप्टेंबरपासून 8 वी, 7 वी आणि 6वी इयत्तेच्या शाळा सुरू करण्यात आल्या. यानंतर 30 सप्टेंबरपासून प्राथमिक शाळेतील मुलांच्या शाळा सुरू होत आहेत.कोरोनाच्या प्रादुर्भावापासून प्राथमिक शाळेतील मुलांच्या संरक्षणासाठी शाळा स्वच्छ करण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये सामाजिक अंतराचे पालन करण्यासाठी मैदानात सर्कल बनविली गेली आहेत. मुलांना फक्त या सर्कलवर चालत जावे लागते. त्याच वेळी सुमारे 12 मुलांना वर्गात बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोरोनानं जारी केलेल्या एसओपीमध्ये पाकिस्तान सरकारने असेही म्हटले होते की, शाळा-महाविद्यालय सुरू झाल्यानंतर दोन आठवड्यांनंतर नियमितपणे येणा-या सर्वांची कोरोना चाचणी घेतली जाईल. कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी या सर्वांचा यात समावेश आहे. मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पाकिस्तान सरकारने कठोर कारवाईचा अवलंब केला आहे. शाळा-महाविद्यालय सुरू झाल्यानंतर 48 तासांच्या आत सरकारने कोरोनासाठी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन न केलेल्या शाळांवर कारवाई सुरू केली आहे. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करणा-या 32 शाळा 32 तासांच्या आत सील करण्यात आल्या.टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, पाकिस्तानच्या नॅशनल कमांड अँड ऑपरेशन्स सेंटरला (एनओसीसी) सांगण्यात आले होते की, पहिल्या 48 तासांत बंद झालेल्या 22 संस्थांपैकी 16 संस्था खैबर पख्तुनखा भागातील आहेत. सीलबंद शाळा महाविद्यालयांपैकी पाच ही पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) आणि एक इस्लामाबादची आहे. त्याचबरोबर सिंध सरकारने अशा 10 शाळा सीलबंद केल्या आहेत ज्या कोरोनाविषयी जारी केलेल्या एसओपीला स्वीकारत नाहीत. याशिवाय कोविडची येथेही 19 प्रकरणे नोंदली गेली.कोरोना संकटातील पाकिस्तानच्या कामगिरीचं जगभर कौतुक होत आहे. अगदी डब्ल्यूएचओनेही पाकिस्तानचे कौतुक केले होते आणि असे म्हटले होते की, त्यांनी कोरोना संसर्ग कसा नियंत्रित केला आहे हे संपूर्ण जगाने पाकिस्तानकडून शिकले पाहिजे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पाक सरकारने शाळा-महाविद्यालयांसाठी एक संपूर्ण मार्गदर्शक सूचना तयार केली होती आणि काटेकोरपणे त्याचे अनुसरण करण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय वर्गखोल्यांमध्ये शिकवण्याची व्यवस्था व अध्यापन करण्याची पद्धतही पूर्णपणे बदलली आहे. विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना वर्गातील मास्क काढण्याची परवानगी नाही. कोणताही विद्यार्थी आपली कोणतीही गोष्ट आपापसांत सामायिक करू शकत नाही. त्याशिवाय प्रवेशद्वाराजवळ त्याचे तापमान थर्मल गनने मोजले जात आहे. प्राथमिक मुलांकडून कर्मचार्‍यांना सामाजिक अंतरावर लक्ष ठेवण्यासाठी कर्तव्य बजावण्यास सांगण्यात आले आहे, ज्यात मुलांचे निरीक्षण करावं लागत आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या